२६ जानेवारीनिमित्त १ हजार ३३२ विद्यार्थ्यानी साकारली ‘सविधानाची प्रतिकृती
◻️ वडगावपान येथील डी. के. मोरे जनता विद्यालयात १२५ फुट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची रांगोळी साकारत ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील डी. के. मोरे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ‘प्रजासत्ताक दिन’ आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाने ’घर घर संविधान अभियान’ चालू केले आहे. संविधानाचे महत्व, त्यातील मूल्य आणि त्याची अंमलबजावणी याबाबत शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यानमध्ये तसेच भावी नागरिकांमध्ये जागरुकता वाढविण्यासाठी १ हजार ३३२ विद्यार्थ्याच्या मानवी साखळीने ‘संविधान पुस्तक प्रतिकृती’ व १२५ फुट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची रंगोळीमध्ये पाठमोरी प्रतिमा काढली होती. संविधानातील मूलभूत हक्क, कर्तव्य आणि विविध तरतुदीचे शिक्षण देण, विद्यार्थ्यामध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक न्यायाची भावना रुजवणे, भारतीय संविधानातील समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही मुल्यांचा प्रचार व प्रसार करणे. विद्यार्थ्यामध्ये विविधतून एकता आणि समता या संकल्पनेचा विकास होईल. विद्यार्थ्याना संविधानाच्या अध्यनामळे आणि चर्चेद्वारे त्यांच्या सामाजिक, आथिक आणि राजकीय अधिकाराची जाणीव करून देणे आणि त्यांच्या जबाबदाऱ्याचे पालन करण्यासाठी प्रेरित करणे हा यामागे उद्देश असल्याचे सांगितले गेले.
याआधी प्राचार्य साहेबराव कोल्हे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. ही संकल्पना विद्यालयातील क्रीडाशिक्षक बाळासाहेब कांडेकर व कलाशिक्षक सत्यानंद कसाब यांनी साकारली होती. त्यांना प्रा. भीमराज काकड, पोपट दये, विकास पवार, भारत सोनवणे, शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. रांगोळी काढण्यासाठी माजी विद्याथीं वैभव थोरात, प्रियंका दामले, समृध्दी थोरात, जान्हवी थोरात, खुशाली खुरसने, कल्याणी इंगळे, जाधव यांनी सहकार्य केले.
यावेळी प्राचार्य साहेबराव कोल्हे मार्गदर्शन करताना म्हणाले, २६ नोव्हेंबर १९४९ रोजी आपण संविधान स्वीकृत करून दि. २६ जानेवारी १९५० पासन संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली. भारतीय संविधानात समाजवाद, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडविण्याच्या व नागरिकांना सामाजिक, आथिक आणि राजनैतिक न्याय विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा, उपासना यांचे स्वातंत्र्य तसेच दर्जा व संधीची समानता प्राप्त करून दिली आहे. संविधान हे एक जिवंत दस्तऐवज आहे. ते देशाच्या विकासात आणि नागरिकांच्या जिवनात गुणवत्तेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. म्हणून प्रत्येकाने संविधान अंगिकारले पाहिजे. असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी स्काऊट गाईंड च्या विद्यार्थ्यानी ध्वजास मानवंदना दिली. भगतसिंग मित्र मंडळ आणि माजी सभापती बाळासाहेब गायकवाड, उपसरपंच सोमनाथ गायकवाड, माजी पंचायत समिती सदस्या बेबीताई थोरात, ग्रामपंचायत सदस्य अरुणशेठ कुळधरण, माजी उपसरपंच रावसाहब जंबुकर यांच्यातर्फे गुणवंत शिक्षकांचा गुणगौरव करण्यात आला.
दरम्यान या कार्यक्रमासाठी प्रताप पवार, उप मुख्याध्यापक बाबा गायकवाड, पर्यवेक्षक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पी. के. दये यांनी केले. तर, विवेक काशींद यांनी विशेष सहकार्य केले.