मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र पडताळणी विशेष मोहिम
◻️ इयत्ता १२ वीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यासाठी आयोजन
संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | इयत्ता १२ वी विज्ञान शाखेमध्ये शिक्षण घेत असलेल्या मागावर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज दाखल न केलेला विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज दाखल करुन या मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी उपायुक्तांनी केले आहे.
यापूर्वी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी ३१ डिसेंबर, २०२४ ही मुदत देण्यात आली होती. परंतू राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या १०० दिवसांच्या उद्दिष्ट कार्यक्रमानूसार ही विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज सीसीव्हीआयएस अथवा www.barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सादर करुन त्याची प्रत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात दाखल करावी. असे आवाहन करण्यात आले आहे.