विळदघाट येथे जिल्हास्तरीय दिव्यांग क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धाचे आयोजन
◻️ डॉ. सुजय विखे पाटील आणि धनश्रीताई विखे पाटील राहणार उपस्थित
संगमनेर LIVE (नगर) | सोमवार व मंगळवार, दि. २७ व २८ जानेवारी २०२५ रोजी जिल्हास्तरीय दिव्यांग मुलामुलींसाठी क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांचे आयोजन जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, स्पेशल ओलंपिक भारत (अहिल्यानगर), जिल्हा क्रिडा विभाग आणि समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद (अहिल्यानगर) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
ही स्पर्धा अभियांत्रिकी महाविद्यालय क्रिडांगण, इंग्लिश मीडियम स्कूल क्रिडांगण, आणि डॉ. विखे पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, अहिल्यानगर येथे सकाळी ठीक ९ वाजता सुरू होईल.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुजय विखे पाटील, धनश्रीताई विखे पाटील (अध्यक्षा, स्पेशल ओलंपिक भारत, अहिल्यानगर), जिल्हा समाज कल्याण अधिकारी आणि विखे पाटील फाउंडेशनचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान याशिवाय, २७ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी ठीक ४ वाजता विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.