श्री क्षेत्र मोठे बाबा देवस्थान ते गाव रस्ता मुरुमीकरण कामाला सुरुवात
◻️ मंत्री विखे पाटील यांच्या पुढाकारने काम पुर्णत्वास ; जेष्ठ नेते कान्हु गिते यांची माहिती
संगमनेर LIVE (आश्वी) | संगमनेर तालुक्यातील पिप्रीं - लौकी अजमपुर तसेच आश्वी खुर्द शिवारात असलेले परिसराचे श्रध्दास्थान श्री क्षेत्र मोठे बाबा देवस्थान ते गावठान रस्त्याचे मुरुमीकरण राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पुढाकारने करण्यात आल्याची माहिती श्री क्षेत्र मोठे बाबा यात्रा कमिटीचे अध्यक्ष आणि जेष्ठ नेते प्रा. कान्हु गिते यांनी दिली.
मागील अनेक दिवसापासुन गावठाण ते श्री क्षेत्र मोठे बाबा रस्त्याचे काम रखडले होते. त्यामुळे डॉ. सुजय विखे पाटील यांची भेट घेऊन ग्रामस्थाच्यावतीने प्रा. कान्हु गिते यांनी सदर रस्ता यात्रेपुर्वी करण्यात यावा अशी विनंती केली होती.
दरम्यान विखे पाटील कुटुंबाचे आश्वी परिसरातील गावावरील प्रेम सर्वश्रुत असल्याने त्यांनी तात्काळ युध्द पातळीवर रस्त्याचे काम सुरु करण्याच्या सुचना दिल्या होत्या. याप्रसंगी आश्वी खुर्द आणि पिप्री - लौकी अजमपुर या दोन्ही गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.