राष्ट्रीय सेवा योजनेतून श्रम व संस्कारांची जडणघडण - अण्णासाहेब भोसले
◻️ प्रवरेच्या आश्वी महाविद्यालयचे राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत श्रम संस्कार शिबिर संपन्न
संगमनेर LIVE | राष्ट्रीय सेवा योजना ही श्रमाची मूल्य शिकवणारी तसेच संस्कार घडवणारी योजना आहे. ज्या विद्यार्थ्यानी श्रम संस्कार शिबिर पूर्ण केले तो, विद्यार्थी आयुष्यात कोठेही कमी पडत नाही. असे बहुमोल मार्गदर्शन प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ संचालक अण्णासाहेब भोसले यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील पिंप्री - लौकी अजमपुर या ठिकाणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक शास्त्र महाविद्यालय आश्वी खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रम संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बुधवारी समारोपप्रसंगी मार्गदर्शन करताना अण्णासाहेब भोसले बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजीराव गिते होते. सरपंच सौ. संगीता गिते, जेष्ठ कार्यकर्ते प्रा. कान्हु गिते, भाऊसाहेब लावरे, प्राचार्य प्रा. देविदास दाभाडे, भारत गिते, पत्रकार संजय गायकवाड, योगेश रातडीया, रवींद्र बालोटे, राजेश गायकवाड, वैभव ताजणे, अनिल शेळके आदि उपस्थित होते. याप्रसंगी पत्रकार दिनाचे औचित्य साधून उपस्थित पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.
दरम्यान कार्यक्रम अधिकारी प्रा. अमित शिंदे यांनी अहवाल वाचन केले. शिबिर यशस्वीतेसाठी प्रा. गणेश शेळके, प्रा. गौरी शिरसाट, प्रा. योगिता तळेकर व प्रा. वैभव गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी अडांगळे व यश चव्हाण या स्वयंसेवकांनी केले. तर आभार प्रा. गणेश खेमनर यांनी मानले.