मांचीहिल येथील तीर्थ क्षेत्र चैतन्य श्री. कानिफनाथ देवस्थानला ‘क’ दर्जा
◻️ कानिफनाथ महाराजानी मांचीहिल टेकडीवर १४ दिवस केला होता मुक्काम
◻️ मंत्री विखे पाटील यांचे ॲड. शाळीग्राम होडगर यांच्यासह आश्वी परिसरातील ग्रामस्थांनी मानले आभार
संगमनेर LIVE | नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीत संगमनेर तालुक्यातील मांचीहिल याठिकाणी असलेल्या तीर्थ क्षेत्र चैतन्य श्री. कानिफनाथ देवस्थानला ‘क’ वर्ग देवस्थानाचा दर्जा प्राप्त करुन दिल्याबद्दल राज्याचे जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे ॲड. शाळीग्राम होडगर यांच्यासह आश्वी परिसरातील ग्रामस्थांनी आभार मानले आहे.
देवस्थानचा इतिहास..
शास्त्रानुसार नवनारायणाचा अवतार म्हणून नवनाथ यांची आराधना केली जाते. नवनाथांनी अध्यात्मिक क्षेत्रात नाथपंथाची स्थापना केली अशी मान्यता आहे. नवनाथापैकी एक असलेल्या कानिफनाथ महाराज यांनी उच्च प्रतीचा राज योगाचा प्रचार व प्रसार आपल्या आदिवासी व गोर - गरीब जाती धर्मातील लाखो शिष्यांना दिला होता.
कानिफनाथ महाराज यांनी मढी येथे संजीवन समाधी घेतलेली आहे. असे असले तरी, समाधीस्थळी पोहोचण्यापूर्वी त्र्यंबकेश्वर येथे भगवान शिवाचे आणि निवृत्तीनाथांचे दर्शन घेऊन ते मढीकडे मार्गस्थ झाले होते. प्रवासादरम्यान त्यांनी संगमनेर तालुक्यातील मांचीहिलच्या टेकडीवर १४ दिवस मुक्काम केल्याची मान्यता आहे.
१९९० साली ॲड. शाळीग्राम होडगर यांनी यांनी उजाड आणि ओसाड माळरानावर शैक्षणिक संकुल उभारणीला सुरुवात केली. यावेळी कानिफनाथ महाराज यांनी मुक्काम केलेल्या ठिकाणी काही खुणा व शिंळेच्या रुपाने काही अवशेष आढळून आले होते. त्यामुळे याठिकाणी मंदिर बांधण्यात आले. तेव्हापासून या माळरानावर निसर्ग सौंदर्याची भर पडत आली आहे.
यात्रात्सव आणि कीर्तनातून नाथांची सेवा अखंडपणे सुरु..
मागील २५ वर्षापासून भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून प्रचार प्रसार वाढत असल्याने दैनंदिन हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत आहे. त्यामुळे रंगपंचमीच्या कालखंडात याठिकाणी पाच दिवसीय मोठा यात्रात्सव साजरा केला जातो. तसेच दर महिन्याला प्रवचन व कीर्तनातून नाथांची सेवा अखंडपणे सुरु आहे. या परिसराचां झालेला विकास हा कानिफनाथ महाराज यांच्या कृपेमुळे झाल्याची प्रांजळ कबुली ॲड. शाळीग्राम होडगर हे नेहमी देत असतात.
अंधश्रद्धा नव्हे तर, केवळ श्रध्दा आणि सेवाभाव..
चैतन्य श्री. कानिफनाथ महाराज देवस्थान हे जागृत देवस्थान असून इच्छापूर्ती करणारे देवस्थान म्हणून देखील तालुक्यात प्रसिद्ध आहे. अंधश्रद्धा किंवा इतर कोणत्याही गोष्टीचा टाहो येथे फोडला जात नसून केवळ श्रध्दा आणि सेवाभावी वृत्तीचा जागर या ठिकाणी नियमितपणे पहावयास मिळतो.
दरम्यान लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या तीर्थ क्षेत्र चैतन्य श्री. कानिफनाथ देवस्थानला पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी ‘क’ वर्ग देवस्थानाचा दर्जा प्राप्त करून दिल्याबद्दल ॲड. शाळीग्राम होडगर यांच्यासह आश्वी बुद्रुक, आश्वी खुर्द, निमगावजाळी, उंबरी बाळापूर, शिबलापूर, कोंची, मांची, प्रतापपूर, ओझर, मनोली, कोकणगाव आदि गावातील ग्रामस्थ आणि भक्तांनी आभार मानले आहे.