तहसीलदार धीरज मांजरे यांची आश्वी येथील सीएससी केंद्राला भेट
◻️ ‘शेतकरी कार्ड’बाबत जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या अडी - अडचणी
◻️ सॉफ्टवेअर बनवणाऱ्या कंपनीला सुधारणा करण्याच्या दिल्या सुचना
◻️ शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे केले आवाहन
संगमनेर LIVE | संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे हे आश्वी परिसरात आले असता त्यांनी आश्वी बुद्रुक येथील अनिल म्हसे यांच्या सुजल कॉम्प्युटर सेंटरला भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडी - अडचणी जाणून घेतल्या.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, तहसीलदार धीरज मांजरे हे बुधवारी एका शासकीय कामानिमित्त आश्वी परिसरात आले होते. काम आटोपल्यावर आश्वी बुद्रुक याठिकाणी असलेल्या अनिल म्हसे यांच्या सुजल कॉम्प्युटर सेंटरला त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत कामगार तलाठी बाबासाहेब बोऱ्हाडे उपस्थित होते. तहसीलदार यांनी ‘शेतकरी कार्ड’ नोंदणीबाबत अनिल म्हसे यांच्याकडून सद्यस्थिती जाणून घेतली.
तसेच उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांकडून नोंदणीसाठी येणाऱ्या अडी - अडचणी माहिती घेतली. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी नावे ऑनलाईन दिसत नसल्याची कैफियत मांडल्यानंतर तहसीलदार यांनी तात्काळ सॉफ्टवेअर बनवणाऱ्या कंपनीशी संपर्क करुन याबाबत माहिती देऊन लवकरात लवकर सुधारणा करण्याच्या सुचना दिल्या. यावेळी कंपनीकडून शनिवारपर्यत योग्य त्या सुधारणा करण्याची ग्वाही देण्यात आली.
याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांनी तहसीलदार धीरज मांजरे यांचा सत्कार केला. यानंतर तहसीलदार यांनी ‘शेतकरी कार्ड’ नोदंणी पावतीचे शेतकऱ्यांना वितरण केले. तर, शासनाच्या या योजनेत नोंदणी करुन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
दरम्यान यावेळी प्रवरा बँकेचे माजी चेअरमन अशोकराव म्हसे, माजी सरपंच हरीभाऊ ताजणे, संजय गायकवाड, माजी ग्रामपंचायत सदस्य विजय म्हसे, नारायण म्हसे, मारुती म्हसे, रामनाथ जऱ्हाड, सोमनाथ गाडेकर, प्रवीण आढाव, संदीप गिते, विजय मारुती म्हसे, भारत म्हसे, ग्रामपंचायत सदस्य अनिल कंगनकर, गणेश खेमनर आदि याप्रसंगी उपस्थित होते.