आश्‍वीचे अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्यासाठी युवक काँग्रेस मैदानात

संगमनेर Live
0
आश्‍वीचे अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्यासाठी युवक काँग्रेस मैदानात

सत्ताधाऱ्यांच्या सोयीचे अन् जनतेच्या गैरसोयीचे राजकारण सुरू - जयश्रीताई थोरात 

◻️ तीव्र आंदोलन छेडण्याचा युवक काँग्रेसचा इशारा 

संगमनेर LIVE | लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हा राज्याला दिशादर्शक ठरला आहे. मात्र संगमनेर तालुक्याचे महत्त्व कमी करण्यासाठी राजकीय उद्देश ठेवून तालुका तोडण्याचा कुटील डाव सत्ताधाऱ्यांनी आखला आहे. लोक भावनेचा सन्मान करून आश्‍वी बुद्रुक येथे प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालयाचा निर्णय तातडीने रद्द करावा  अन्यथा तीव्र आंदोलन उभे केले जाईल असा इशारा संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आला.

युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार धीरज मांजरे यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष निखिल पापडेजा, कृती समितीचे अध्यक्ष भाऊराव रहाणे, हर्षल राहणे, वैष्णव मुर्तडक, सौरभ कडलग, अजिंक्य शिंदे, शुभम शिंदे, शुभम काळे, ओंकार बिडवे, ऋतिक राऊत, एकनाथ श्रीपाद, उज्वला राहणे, स्वाती राऊत, प्रीतम साबळे, रामेश्वर पानसरे, रमेश गोखले, प्रथमेश बालोडे, आदित्य बर्गे, मंगेश पावशे, अर्जुन घोडे ,रमेश गफले ,तुषार काकड आदींसह युवा काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात एक तालुका एक परिवार ही संकल्पना रुजली आहे. अनेक दिवसांच्या सततच्या कामातून लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुका उभा केला. देवकवठे ते बोटा असता हा विस्तारित तालुका असून गावोगावी विकासाच्या योजना राबवल्या आहेत. आज संगमनेर तालुका राज्याला दिशादर्शक आहे. मात्र संगमनेर तालुक्याचे महत्व कमी करण्याबरोबर एकजूट तोडण्यासाठी राजकीय उद्देश ठेवून अत्यंत चुकीच्या पद्धतीने आश्‍वी बुद्रुक अप्पर तहसील कार्यालय प्रस्तावित करण्यात आले आहे.

याबाबत ग्रामपंचायतमध्ये ठराव घेऊन हा निर्णय रद्द करावा अशी मागणी आहे. मात्र प्रशासनाकडून जो प्रस्ताव दाखल झाला आहे, त्यामध्ये कोणतीही सुधारणा केलेली नाही. हे जनतेच्या गैरसोयीचे तर सत्ताधाऱ्यांच्या सोयीचे असे राजकारण यामध्ये आहे. हा अत्यंत दुर्दैवी निर्णय असून तातडीने रद्द करावा अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा त्यांनी दिला.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गावोगावच्या ग्रामपंचायतीने ठराव करून अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्याची मागणी केली आहे. मात्र प्रशासन हे हेकेखोर पद्धतीने वागत आहे. जनभावनेचा आदर करावा व तातडीने हा ठराव रद्द करावा अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा संपूर्ण तालुका रस्त्यावर उतरून मोठे जन आंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही युवक काँग्रेसने दिला.

दरम्यान हे निवेदन नायब तहसीलदार सुभाष कदम यांनी स्वीकारले असून जिल्हाधिकारी यांच्याकडे आपल्या भावना कळवल्या जातील असे सांगितले.

युवक काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको चा इशारा..

अत्यंत अन्यायकारक पद्धतीने अप्पर तहसील कार्यालय तालुक्यातील जनतेवर लादण्याच्या निर्णयाविरोधात संगमनेर तालुक्यात मोठी संतापाची लाट निर्माण झाली आहे. गावगावचे ठराव झाले आहेत. आता संगमनेर तालुक्यातील युवा काँग्रेस व सर्व युवक संघटना रस्त्यावर उतरणार असून एक - दोन दिवसांमध्ये प्रत्येक गावात रस्ता रोको सह सर्व महामार्ग चक्काजाम पद्धतीने अडविले जाणार असल्याचा इशाराही युवक काँग्रेसने दिला आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !