श्री साईबाबा संस्थानला टीव्हीएस कंपनीकडून दुचाकीची देणगी
संगमनेर LIVE (शिर्डी) | श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी करीता आज टीव्हीएस कंपनीच्या वतीने दुचाकी मोटारसायकल देणगी स्वरूपात सुपूर्द करण्यात आली.
यावेळी टीव्हीएस मोटर्सचे उपाध्यक्ष यु. सेल्वम यांनी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे दुचाकीची चावी तसेच गाडीच्या किंमतीचा २ लाख ६० हजाराचा धनादेश सुपूर्द केला. त्यानंतर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी यु. सेल्वम यांचा यथोचित सत्कार केला.
विशेष म्हणजे, यापूर्वीही टीव्हीएस कंपनीने श्री साईबाबा संस्थानला १० दुचाकी आणि २ तीन चाकी वाहने देणगी स्वरूपात प्रदान केली आहेत.
दरम्यान यावेळी कंपनीचे एरिआ मॅनेजर अभिजित व्यास, संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदिपकुमार भोसले, अभियंता भिकन दाभाडे आणि वाहन विभाग प्रमुख अतुल वाघ उपस्थित होते.