◻️ आश्वी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील आणि आश्वी पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या आश्वी खुर्द येथील प्रकाश रंगनाथ गडकरी आणि ओझर बंधारा येथून नवनाथ भैय्या राठोड यांची मोटारसायकल चोरीला गेली आहे. याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आश्वी खुर्द येथील प्रकाश गडकरी यांनी २०१५ साली बजाज कंपनीची प्लॅटिना (रंग - काळा) गाडी (एम.एच. १७. बीएच. ५२२८) घेतली होती. मंगळवार दि. ११ फेब्रुवारी २०२५ रोजी नेहमीप्रमाणे रात्री १० वाजता घरासमोर हॅडल लॉक करून गाडी लावली होती. सकाळी ५.३० उठल्यानंतर पहिले असता गाडी दिसली नाही. परिसरातील इतर ठिकाणी शोध घेतला मात्र गाडी सापडली नाही. त्यामुळे २५ हजार रुपये किंमतीची मोटारसायकल चोरी गेल्याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २०/२०२५ नुसार बीएनएस २०२३ कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
दुसऱ्या एका घटनेत ओझर बंधारा येथे ऊस तोडणी निमित्ताने वास्तव्यास असलेले नवनाथ भैय्या राठोड (मुळ रा. नाशिक) हे पाल करून राहत आहेत. २०२४ साली होंडा कंपनीची (रंग - काळा) मोटरसायकल (एम.एच. १४.बी.क्यू. ००२१) घेतली होती. शुक्रवार दि. १४ फेब्रुवारी २०२४ रोजी रात्री नेहमीप्रमाणे रात्री १० वाजेच्या सुमारास पालासमोर लावली होती. सकाळी ४.३० वाजता उठलो असता गाडी त्या ठिकाणी नव्हती. त्यामुळे सर्वत्र शोध घेऊनही गाडी मिळून न आल्यामुळे गुन्हा रजिस्टर नंबर २१/२०२५ नुसार बीएनएस २०२३ कलम ३०३(२) प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान या दोन्ही गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अनुक्रमे हेड कॉन्स्टेबल प्रदीप साठे व पोलीस नाईक स्वाती ताजणे हे करत आहेत.