कळस बुद्रुक जिल्हा परिषद शाळेत डिजिटल क्लासरूमचे लोकार्पण

संगमनेर Live
0
कळस बुद्रुक जिल्हा परिषद शाळेत डिजिटल क्लासरूमचे लोकार्पण

◻️ रोटरी क्लब संगमनेरचा सुत्य उपक्रम 

संगमनेर LIVE (अकोले) | रोटरी क्लब संगमनेर यांच्या वतीने अकोले तालुक्यातील कळस बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला डिजिटल क्लासरूम भेट देण्यात आली.

कळस बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित कार्यक्रमात रोटरी क्लब संगमनेरचे अध्यक्ष रो. साईनाथ साबळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात डिजिटल क्लासरूम चा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी रोटरी क्लब संगमनेरचे सेक्रेटरी विश्वनाथ मालणी, उपाध्यक्ष महेश वाकचौरे, दिलीप मालपाणी, अजित काकडे, पवन कुमार वर्मा, आनंद हासे, ऋषिकेश मोंढे, सौरभ म्हालस, खोसे, कामगार पोलीस पाटील गोपीनाथ ढगे, भरत वाकचौरे, डी. टी. वाकचौरे आदि उपस्थित होते.

यावेळी रो. अजित काकडे यांनी रोटरी क्लबच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सामाजिक, शैक्षणिक, आरोग्याविषयक उपक्रमांची माहिती दिली. कळसचे सरपंच राजेंद्र गवांदे, अगस्ती साखर कारखान्याचे संचालक सिताराम वाकचौरे, अगस्ती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त गणेश महाराज वाकचौरे, संगमनेर साखर कारखाना संचालक संभाजी वाकचौरे, बाळासाहेब वाकचौरे यांची भाषणे झाली.

यावेळी रो. ऋषिकेश मोंढे यांनी शाळेला अकरा हजाराची देणगी दिली. रोटरी क्लबच्या वतीने इस्रो सहली साठी निवड झालेल्या दुर्गा वाकचौरे हिचा एक हजार रुपये बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला. रो. दिलीप मालपाणी यांचा वाढदिवस विध्यार्थ्यासमवेत साजरा करण्यात आला. या डिजिटलं क्लास रूम साठी विशेष प्रयत्न रो. महेश वाकचौरे यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्तविक माजी सरपंच भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले. सूत्रसंचालन सपना पांडे व सोनवणे यांनी तर आभार मुख्याध्यापक तान्हाजी वाजे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी व्यवस्थापन समितीचे सदस्य नामदेव निसाळ,  इम्रान सय्यद, मनीषा वाकचौरे, सुवर्णा ढगे यांनी प्रयत्न केले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !