शेतकऱ्यांसाठी निराशा जनक अर्थसंकल्प - बाळासाहेब थोरात
◻️ महागाई व बेरोजगारी कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना नाही
संगमनेर LIVE | केंद्रीय अर्थमंत्री यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात फक्त मोठमोठ्या पोकळ घोषणा आहेत. प्रत्यक्षात यामध्ये शेतकरी व गोरगरिबांसाठी कोणतीही ठोस उपाययोजना नाही. अशी टिका माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.
ते पुढे म्हणाले, कर्जमाफीची घोषणा करून राज्यात सत्तेवर आलेल्या सरकारने शेतकरी कर्जमाफी व शेतमाल हमीभावाबाबत कोणताही उल्लेख केलेला नाही. महागाई आणि बेरोजगारी कमी करण्यासाठी या अर्थसंकल्प मध्ये काहीही तरतूद केलेली नाही. भाजप म्हणजे फक्त जाहिरातबाजी आणि पोकळ घोषणाबाजी असून हा अर्थसंकल्प म्हणजे शेतकरी आणि तरुणांसाठी अत्यंत निराशा जनक असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.