डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून संगमनेर शहरात स्वच्छता अभियान
◻️ आमदार अमोल खताळ स्वतः झाले स्वच्छता अभियानात सहभागी
◻️ बसस्थानक, महावितरण, पंचायत समिती तसेच शासकीय विश्रामगृह परिसर घाणीच्या विळख्यातून मुक्त
संगमनेर LIVE | डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त संगमनेर येथे स्वयंसेवकांनी बसस्थानक, महावितरण, पंचायत समिती तसेच शासकीय विश्रामगृह या परिसरात स्वच्छता अभियान राबवले. यावेळी आमदार अमोल खताळ यांनी या अभियानात सहभाग घेत बसस्थानक परिसरात स्वच्छता केली.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री व भारत भूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात स्वयं सेवकांकडून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी संगमनेर येथील बसस्थानक परिसरा अस्ताव्यस्त पडलेला सर्व कचरा साफ करण्यात आला. त्याचबरोबर तुंबलेल्या गटारी देखील स्वच्छ केल्या आहेत. तसेच महावितरण, पंचायत समिती, शासकीय विश्रामगृह परिससरात देखील स्वयंसेवकांसमवेत आमदार अमोल खताळ यांनी हातात झाडू घेऊन परिसराची स्वच्छता केली.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ नेते सुभाष कोथंबिरे, संगमनेर आगाराचे कार्यशाळा अधीक्षक निलेश करंजकर, कार्यालयीन लिपिक अनिल साबळे, भाजप उद्योग आघाडीचे प्रमुख महेश जगताप, भाजप शहर सरचिटणीस राहुल भोईर, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान नाशिक समिती, संगमनेर शहर व संगमनेर खुर्दचे सेवेकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सर्व सेवेकऱ्यानी मोठ्या प्रमाणात स्वच्छता अभियान राबवत स्वच्छतेचा संदेश दिला. येथून पुढे ही नगरपालिका प्रशासन आणि एसटी महामंडळ प्रशासन यांनी हा सर्व परिसर नियमितपणे स्वच्छ ठेवावा. यासाठी योग्य त्या सूचना आमदार अमोल खताळ यांनी दिल्या.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. यापुढे बसस्थानक परिसरात कचरा होणार यांची खबरदारी घेण्याची ग्वाही संगमनेर आगाराचे कार्यशाळा अधिक्षक निलेश करंजकर यांनी दिली.