मांचीहिल येथे मोफत सर्व रोगनिदान, तपासणी आणि उपचार शिबीराचे आयोजन
◻️ आश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयातील उच्च शिक्षित, अनुभवी, तज्ज्ञ डॉक्टर आणि प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्याचे पथक सेवेसाठी तत्पर
◻️ पंचक्रोशीतील सर्व वयोगटातील नागरीकांना मोफत आरोग्य शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन
संगमनेर LIVE (आश्वी) | संगमनेर तालुक्यात आरोग्य क्षेत्रात नावलौकिक असलेल्या मांचीहिल येथील आश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयात मोफत सर्व रोगनिदान, तपासणी आणि उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. निसर्गाच्या सानिध्यात राबविण्यात येत असलेल्या शिबीराचा सर्व वयोगटातील महिला, पुरुष आणि लहान मुले यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. या शिबिराची रविवार दि. १६ मार्च २०२५ पासून सुरुवात झाली असून पुढील ४५ दिवस या शिबीराचा नागरीकांना लाभ घेता येणार आहे.
शिबिरादरम्यान उच्च शिक्षित, अनुभवी, तज्ज्ञ डॉक्टर आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचे पथक रुग्णांच्या सेवेसाठी उपस्थित राहणार आहे. यावेळी योग्य तपासणी, आवश्यक सल्ला आणि मार्गदर्शन केले जाणार आहे. या शिबिरात आयुर्वेद अंतर्गत मधुमेह, पोटाचे विकार व उपचार, श्वसन व त्वचा विकार, स्नायू व संधी विकारांवर उपचार केले जाणार आहे.
तसेच हृदयरोग, उच्च रक्तदाब, अलर्जी व दमा, पक्षाघात, त्वचाविकार, लिव्हर व किडनी विकार, हाडाचे व सांध्याचे आजार, वातविकार, मधुमेह, बालरोग, मुळव्याध, पचन, कान - नाक - घसा, स्त्रीरोग, थायरॉईड, मुळव्याध व अन्य जुनाट विकार यावर उपचार होणार आहेत.
त्याचबरोबर नेत्ररोग, दंतविकार, केस गळती, सौदर्य समस्या, स्त्रीरोग, कॅन्सर, किडनी आदी आजार योग्य उपचार, सल्ला व मार्गदर्शन केले जाणार आहे.
१) स्त्रीरोग विभाग :- मासिक पाळीची अनियमितता, प्रसूती, कुटुंब नियोजन, गर्भ पिशवी, महिलांच्या स्तनातील गाठीचे उपचार / सुसज्ज ऑपरेशन थेटर उपलब्ध
२) शल्यतंत्र विभाग विभाग :- मुळव्याध, भंगदर, शरीरावरील गाठीचे उपचार / सुसज्ज ऑपरेशन थेटर उपलब्ध
३) नेत्ररोग विभाग :- मोतीबिंदू, तिरळेपणा, डोक्यावरील पडदा तसेच डोळ्याचे इतर आजारावर उपचार / सुसज्ज ऑपरेशन थेटर उपलब्ध
४) बालरोग विभाग :- कुपोषण, बालदमा, वजन कमी असणे, सुवर्ण प्राशन संस्कार शिबीर
५) काय चिकित्सा व पंचकर्म विभाग :- दमा, मधुमेह, जुनाट सर्दी, सांध्यांचे, पोटाचे, मणक्यांचे विकार, डोके, पाठ, कंबर दुखणे, थॉयराइड, उदर व कावीळ विकार, वास्तव्याधी, आमवात आदि आजारावर उपचार
६) इतर आजार विभाग :- चेहऱ्यावर सुज येणे, खाज येणे, चेहऱ्यावरील विविध प्रकारचे डांग आणि वण, रक्ताचे आजार, चक्कर येणे, शारीरीक वाढी बाबतच्या समस्या, केस गळती सह केसांच्या विविध समस्या, पांढरे कोड, सौंदर्य उपचार
वरील सर्व विभागांचे जिल्ह्यातील नामवंत व तज्ज्ञ डॉक्टर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
शिवाय प्रकृतीप्रमाणे आहार, विहार व योग संदर्भात माहिती देखील देण्यात येणार आहे. शिबीरात सर्व वयोगटातील रुग्णांची तपासणी होणार असून काही निवडक आजार व ऑपरेशन वगळता शिबीर पूर्णपणे मोफत आहे. यात तपासणी व औषधे ही देखील पूर्णपणे मोफत दिली जाणार आहेत.
दरम्यान अधिक माहितीसाठी प्रा दत्ता शिंदे यांना मो. नं - 9960493773 यावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.