संगमनेर शहरात महायुतीची मिरवणूक तब्बल सात तास चालली!

संगमनेर Live
0
संगमनेर शहरात महायुतीची मिरवणूक सात तास चालली

◻️ आघोरी, आदिवासी नृत्य आणि ढोलताशा पथक ठरले संगमनेरकरासाठी आकर्षण

संगमनेर LIVE | संगमनेर शहरात महायुतीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथी नुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजन्मोत्सव सोहळानिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. तब्बल सात तास चाललेल्या या मिरवणुकीत सादर करण्यात आलेली अघोरी व आदिवासी नृत्याने संगमनेरकर भारावून गेले. ढोल ताशंचा गजर तसेच “छत्रपती शिवाजी महाराज की जय जय” आणि “जय भवानी जय शिवाजी” या जयघोषामुळे परिसर दुमदुमला होता.

संगमनेर नगरपालिकेच्या प्रवेशद्वारापासून या मिरवणुकीला आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली व सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती करून सुरुवात झाली. मिरवणुकीच्या अग्रभागी ढोलीबाजा, सनई - चौघडे त्या पाठोपाठ छत्रपती शिवाजी महाराजाची पालखी, बाल वारकऱ्यांचे भजन, ढोलताशा पथक, शिवकालीन मर्दानी खेळ लाठी - काठी, हरियाणावरून बोलविलेले अघोरी नृत्य, आदिवासी महिला व पुरुष आदिवासी नृत्य, कल्याण बदलापूरचे आकर्षण बँजोपथक आणि डी. जे. या मिरवणुकीत सहभागी होते. 

यावेळी तरुण मित्रमंडळ हातामध्ये भगवे ध्वज घेऊन मिरवणुकीत सहभागी झाले होते. ही मिरवणूक लालबहादूर शास्त्री चौक, बाजारपेठ तेलीखुंट, सय्यदबाबा चौक, मेन रोड, चावडी चौक, अशोक चौक छत्रपती शिवाजी स्मारकाच्या मार्गे संगमनेर बस स्थानक येथे मिरवणुकीचा समारोप झाला.  या मिरवणूकीत हजारो शिवप्रेमी तरुण सहभागी झाले होते.

मिरवणूक बाजारपेठेत आल्यानंतर आमदार अमोल खताळ स्वतः यामध्ये सहभागी झाले‌ बाजारपेठेतील आणि मेन रोडवरील सर्व व्यापाऱ्यांनी आ. खताळ यांचे स्वागत करत सत्कार केला.

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे तसेच बस स्थानकावर आमदार अमोल खताळ आणि त्यांच्या पत्नी निलमताई खताळ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून महाआरती करण्यात आली. या मिरवणुकीमध्ये शिवप्रेमी, शिवसेना, महायुतीचे पदाधिकारी शिवसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

दरम्यान यावेळी श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे यांच्या मार्गदर्शनखाली संगमनेर उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांच्या सहकार्यानी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखे नुसार व तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याचे पहिले वर्ष होते. त्यासाठी सर्वांनी सहकार्य केले. येथून पुढील काळामध्ये प्रत्येक वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवरील प्रेम किती आहे आणि आमचं हिंदुत्व खोटं नाही. हे संगमनेरकरांनी आज दाखवून दिले आहे. आम्ही सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे कालही होतो आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. 

अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी बस स्थानकात जागा कमी पडत आहे. त्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती लवकरचं बैठक व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच जागेचा प्रश्नं निकाली काढून पुढील वर्षापर्यत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभा करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी आमदार अमोल खताळ यांनी दिली.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !