उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून संगमनेरच्या प्रणिता सोमनला आर्थिक मदत
◻️ आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते पाच लाखाचा धनादेश कुटुंबाकडे सुपूर्त
◻️ युरोपमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदतीची होती गरज
संगमनेर LIVE | संगमनेर येथील सायकलिंग प्रकारातील आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रणिता प्रफुल्ल सोमन हिला युरोपमध्ये प्रशिक्षणासाठी जाण्याकरिता आर्थिक मदत म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने पाच लाख रुपयांचा धनादेश आमदार अमोल खताळ यांनी नुकताच तिच्या आई - वडिलांकडे सुपूर्त केला आहे.
संगमनेरची कु. प्रणिता सोमण हिने सायकलिंग या प्रकारात राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकविले होते. त्यानिमित्त आमदार अमोल खताळ यांनी डॉ. प्रफुल्ल सोमन यांच्या निवासस्थानी जाऊन सुवर्ण पदक विजेती प्रणिता हिचा सत्कार केला होता. त्यावेळी प्रणिता हिला प्रशिक्षण घेण्यासाठी युरोपमध्ये जायचे आहे. त्यामुळे तिला आर्थिक मदतीची गरज आहे. अशी माहिती तिचे वडील डॉ. सोमन यांनी दिली होती. त्यानंतर आमदार खताळ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन माहिती दिली. त्यामुळे त्यांनी तात्काळ पाच लाख रुपयांचा धनादेश आमदार खताळ यांच्याकडे दिला.
दरम्यान संगमनेरला आल्यानंतर आमदार खताळ यांनी धनादेश प्रणिताचे आई - वडिल यांच्याकडे सुपूर्त केला. त्यामुळे डॉ. सोमण परिवाराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार खताळ यांचे आभार मानले आहे.