डॉ. विखे पाटील आयटीआय मध्ये ‘इंन्फोसिस स्प्रिंगबोर्ड ‘स्किल ऑन व्हिल्स’ उपक्रम
संगमनेर LIVE (नगर) | अहिल्यानगर येथील डॉ. विखे पाटील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड या कंपनीमार्फत राबविण्यात आलेल्या ‘स्किल ऑन व्हिल्स’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. एलईडी स्क्रीन व लॅपटॉपच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रभावी प्रशिक्षण देण्यात आले.
या उपक्रमाचे उद्घाटन डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे टेक्निकल डायरेक्टरर सुनील कल्हापुरे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रशिक्षणात इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रीशियन, वायरमन तसेच कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रॅमिंग असिस्टंट या ट्रेडमधील प्रशिक्षणार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड द्वारे राबविण्यात येणारा ‘मेकर लॅब’ हा उपक्रम २१व्या शतकातील जीवनकौशल्ये, नवकल्पनांची ओळख व वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याच्या उद्देशाने राबवला जात आहे. व्हिडिओ बेस्ड लर्निंग, असाइनमेंट लर्निंग यासोबतच ट्रॅफिक कंट्रोल सिस्टम, ऑटोमॅटिक स्ट्रीट लाइट कंट्रोल सिस्टीम यांची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली.
उद्घाटन प्रसंगी सुनील कल्हापुरे यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक करत विद्यार्थ्यांसाठी हे प्रशिक्षण भविष्यासाठी उपयोगी ठरणारे असल्याचे सांगितले.
यावेळी संस्थेचे प्राचार्य अनिल सुर्यवंशी, उपप्राचार्य काकडे, तुतारे, बडे, साठे, श्रीमती नलगे आणि आयटीआयतील सर्व शिक्षक उपस्थित होते.
दरम्यान या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल जलसंपदा मंत्री आणि संस्थेचे चेअरमन राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुजय विखे पाटील, डायरेक्टर जनरल (प्रशासन) डॉ. पी. एम. गायकवाड आणि डायरेक्टर (मेडिकल) डॉ. अभिजीत दिवटे यांनी संस्थेचे अभिनंदन केले आहे.