उंबरी बाळापूर येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवाचे आयोजन
◻️ भव्य मिरवणुकीसह दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन
◻️ बाईजी बाबा यात्रोत्सवाची जयत तयारी
संगमनेर LIVE (आश्वी) | पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथे उद्या शनिवार दि. ३१ मे रोजी विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून बाईजी बाबा यात्रोत्सवाची देखील जयत तयारी सुरू असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
उद्या शनिवारी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन स्थानिक आणि पंचक्रोशीतील मान्यवर व्यक्तीच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. सायंकाळी ६ वाजता पारंपारिक वाद्यांच्या गजरात गावातून प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. रात्री ७ वाजता संकटेश्वर महादेव मंदिरांत हभप रमेश महाराज तांबडे यांचे अमृततुल्य कीर्तन होणार आहे. त्यानंतर उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे.
दरम्यान पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा त्रिशताब्दी जयंती सोहळा आणि बाईजी बाबा यात्रोत्सवासाठी ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन राजमाता अहिल्यादेवी होळकर मित्रमंडळ आणि उंबरी बाळापूर ग्रामस्थांनी केले आहे.