कळसेश्वर विद्यालयाचा इयत्ता दहावीचा १०० टक्के निकाल

संगमनेर Live
0
कळसेश्वर विद्यालयाचा इयत्ता दहावीचा १०० टक्के निकाल

◻️ अमन सय्यद विद्यालयात प्रथम ; यशस्वी विद्यार्थ्याचे कौतुक 

संगमनेर LIVE (अकोले) | अकोले तालुक्यातील कळस बुद्रुक येथील कळसेश्वर विद्यालयाचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा शंभर टक्के निकाल लागला आहे.

विद्यालयातून अमान इकबाल सय्यद ९४.२० टक्के गुण मिळवून प्रथम, अदिती भानुदास चौधरी ९२.८० टक्के गुण मिळवून द्वितीय, अदिती प्रवीण वाकचौरे ८९.४० टक्के व श्रद्धा माधव कोल्हाळ ८९.४० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक तर, ऋतिक सुरेश क्षीरसागर ८८.२० टक्के गुण मिळवून चतुर्थ व यशश्री गणेश झोडगे ८५.८० टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.

कळसेश्वर विद्यालयातून ८० टक्क्याच्या पुढे १४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या विध्यार्थ्याना माजी मुख्याध्यापिका नंदा बिबवे, शिवाजी आवारी, मच्छिंद्र साळुंखे, गीतांजली खरबस, केशव महाले, मनीषा शिंदे, प्रशांत जाधव, प्रतीक्षा घुले, कुमार पालवे, सुरेश वाघमारे आदींचे मार्गदर्शन लाभले.

विद्यालयातील सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्याचे जिल्हा परिषद माजी सभापती कैलासराव वाकचौरे, संस्थेच्या सेक्रेटरी शैलजा पोखरकर, कार्याध्यक्ष शिरीष नाईकवाडी, सतीश नाईकवाडी, संदीप नाईकवाडी, देवराम वाकचौरे, माजी सरपंच भाऊसाहेब वाकचौरे, यादव वाकचौरे, सरपंच राजेंद्र गवांदे, संगमनेर कारखान्याचे संचालक अरुण वाकचौरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ईश्वर वाकचौरे, उपसरपंच केतन वाकचौरे, पोलीस पाटील गोपीनाथ ढगे, शिवसेना नेते रावसाहेब वाकचौरे, तंटामुक्तीचे अध्यक्ष ज्ञानदेव निसाळ, विद्यालयाचे मुख्याध्यापक भाऊसाहेब घेलवडे, शालेय व्यवस्थापन समिती सर्व सदस्य व सर्व ग्रामस्थांनी विद्यार्थ्याचे व शिक्षकांचे अभिनंदन केले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !