एकविरा फाउंडेशनकडून महिलांसाठी मोफत ‘फायर अँड सेफ्टी’ प्रशिक्षण

संगमनेर Live
0
एकविरा फाउंडेशनकडून महिलांसाठी मोफत ‘फायर अँड सेफ्टी’ प्रशिक्षण

◻️ यशोधन कार्यालयात आयोजित प्रशिक्षणाला महिलांची लक्षणीय उपस्थिती 

संगमनेर LIVE | माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या आणि डॉ. जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या एकवीरा फाउंडेशनच्या माध्यमातून महिला व तरुणींसाठी सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन केले जात असते. त्याचाच एक भाग म्हणून महिलांसाठी मोफत ‘फायर अँड सेफ्टी’चे प्रशिक्षण नुकतेच यशोधन कार्यालय येथे आयोजित केले होते.

यावेळी सुर्या कंपनीचे राजू थोरात व संतोष रुपवते यांनी महिलांना घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर कसा वापरावा, कशाप्रकारे काळजी घ्यावी, गॅस गळती व दुर्घटना होण्याची प्रमुख कारणे व त्यावरील उपाय, गॅसची बचत आणि सुरक्षितता, गॅस गळतीमुळे होणारे अपघात आणि दुर्घटना टाळण्यासाठी काय करावे. याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तर, एकवीरा फाउंडेशनने आयोजित केलेल्या सुदंर उपक्रमाचे कौतुक केले.

याप्रसंगी सौ. सुनीता कांदळकर यांनी एकविरा फाउंडेशनच्या कामाची व कार्यपद्धतीची माहिती देताना महिला सबलीकरण व सक्षमीकरण करणे हा एकवीरा फाउंडेशनचा उद्देश असल्याचे सांगितले. दरम्यान या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शर्मिला हांडे यांनी केले. तर, आभार सुनीता कांदळकर यांनी मानले. यावेळी महिला आणि युवतीची उपस्थिती लक्षणीय होती.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !