शहीद जवान संदीप गायकर यांच्या कुटुंबियांचे बाळासाहेब थोरातांकडून सांत्वन

संगमनेर Live
0
शहीद जवान संदीप गायकर यांच्या कुटुंबियांचे बाळासाहेब थोरातांकडून सांत्वन

◻️ शहीद जवानांच्या महाराष्ट्राला अभिमान - बाळासाहेब थोरात 

संगमनेर LIVE | जम्मू काश्मीर मध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेले अकोले तालुक्याचे सुपुत्र शहीद जवान संदीप पांडुरंग गायकर यांच्या कुटुंबीयांचे आज महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांत्वन केले. याचबरोबर या सुपुत्राचा संपूर्ण महाराष्ट्राला सदैव अभिमान राहील असे अभिवादन केले आहे.

ब्राह्मणवाडा येथे शहीद संदीप गायकर यांच्या कुटुंबीयांची माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भेट घेतली. याप्रसंगी वीर पत्नी रूपाली गायकर, वीर जवान संदीप यांचे वडील पांडुरंग गायकर याचबरोबर विक्रम नवले, सुरेश गडाख, ॲड. आर. बी. हांडे, शिवाजी नेहे, सुभाष गायकर, भारत आरोटे, संदीप वाघमारे, रजनीकांत भांगरे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

जम्मू काश्मीर मधील तिसवाड सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना १५ मराठा बटालियन मध्ये कार्यरत असलेले अकोले तालुक्याचे सुपुत्र संदीप जवान यांना हुतात्म प्राप्त झाले. यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठी शोककळा पसरली. हे वृत्त समजतात माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शोक व्यक्त करत देशाच्या सीमांचे रक्षण करण्याकरता आपल्या सुपुत्राने बलिदान दिले असल्याने त्याची बलिदान हे व्यर्थ जाणार नसून या त्यांच्या बलिदानाचा संपूर्ण जिल्ह्याला अभिमान राहील असे गौरवोउद्गार काढले होते.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. याचबरोबर या सुपुत्राने देशासाठी बलिदान दिले असून अहिल्यानगर जिल्हा, संगमनेर तालुका व अकोले तालुका हा सदैव या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहील असे सांगताना वीर जवान संदीप याचा आपल्याला सदैव अभिमान राहील अशी भावना व्यक्त केली.

दरम्यान यावेळी गावातील पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !