सादतपूर येथे मंत्री विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न
◻️ वृक्षारोपण आणि विद्यार्थ्याना शालेय साहित्यांचे केले वाटप
संगमनेर LIVE (आश्वी) | राज्याचे जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त संगमनेर तालुक्यातील सादतपूर येथे वृक्षारोपण आणि विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप करत मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी मोठ्या उत्साहात विविध सामाजिक कार्यक्रम राबविण्यात आले. याप्रसंगी प्रवरा सहकारी बँकचे संचालक बबनराव काळे, कारखान्याचे माजी संचालक रमेश मगर, सरपंच नारायण गुंजाळ, उपसरपंच दिलीप मगर, दगडु शिंदे, प्रकाश गोरे यांच्यासह ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
दरम्यान यावेळी उपस्थित चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.