मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून जिल्ह्यात दिव्यांग सक्षमीकरण मोहिम

संगमनेर Live
0
मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून जिल्ह्यात दिव्यांग सक्षमीकरण मोहिम  

◻️ तहसीलदार अमोल मोरे यांचे दिव्यांग नागरीकांना विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन 

संगमनेर LIVE (राहाता) | जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग अहिल्यानगर यांच्या माध्यमातून विविध योजना या अस्थिव्यंग व्यक्तीसाठी सुरू आहेत. अहिल्यानगरचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम होत असून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन राहात्याचे तहसीलदार अमोल मोरे यांनी केले.

केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकारच्या भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम कानपूर, एस. आर. ट्रस्ट मध्य प्रदेश, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने, एडीप योजनांतर्गत राहाता येथे आयोजित शिबीरात मोरे बोलत होते. 

यावेळी गटविकास अधिकारी विवेक गुंड, तालुका आरोग्य विभाग  डाॅ. संजय घोलप, अँड. रघुनाथ बोठे, माजी नगराध्यक्ष सोपान  सदाफळ, कैलास सदाफळ, श्री साई श्रद्धा ग्रामीण मूक बधिर विद्यालयांचे बाळासाहेब कासार, डाॅ. यश चुंबळे, संजय सदाफळ, भाऊसाहेब जेजुरकर, साहेबराव निथाने, जबाजी मेचे, विजय सदाफळ, सागर सदाफळ, विजय शिंदे, अंबादास गाडेकर, चंद्रभान मेहत्रे, उत्तमराव डांगे, राजेंद्र वाबळे आदीसह लाभार्थी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना मोरे म्हणाले की, मंत्री विखे पाटील आणि डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे अध्यक्ष डाॅ. सुजय विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नामुळे ही योजना तळागाळापर्यंत पोहोचत आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळत असून त्यांना नोंदणी तपासणी आणि लगेचच साहित्य मिळत असल्यामुळे त्यांची मोठी गैरसोय आता दूर होत आहे. या योजनेचा गरजूंनी लाभ घ्यावा असेही त्यांनी सांगितले.

अँड. रघुनाथ बोठे म्हणाले, शिर्डी मतदार संघात आणि जिल्ह्यांमध्ये जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रम हे लोकाभिमुख ठरत आहेत. विविध योजनेचा प्रचार प्रसार करत असतानाच योग्य लाभार्थ्यापर्यंत ही योजना कशी पोहोचेल आणि या योजनेतून त्या लाभार्थ्याला दिलासा कसा मिळेल? यासाठी मंत्री विखे पाटील हे कायमच प्रयत्नशील राहिले आहेत. आज जिरायत भागामध्ये पाणी पोहोचले आहे. निळवंडे गोदावरी कालव्यांचा प्रश्न ही आता मार्गी लागला आहे.

प्रारंभी कासार यांनी योजनेची सविस्तर माहिती दिली. यावेळी राहाता तालुक्यातील विविध गावातील लाभार्थी उपस्थित होते.

जनसेवा फाउंडेशन सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून मंत्री विखे पाटील आणि डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचलित जिल्हा दिव्यांग संचलित मंगळवार दि. १५ जुलै रोजी साई विठ्ठला लॉन्स, चितळी रोड, राहाता येथे तर सोमवार दि. २१ जुलै रोजी  श्री साई निर्माण इंग्लिश मिडीयम स्कूल, विमानतळ रोड, श्री कृष्ण नगर शिर्डी येथे करण्यात आल्याची माहीती डॉ. अभिजित दिवटे यांनी दिली.

दरम्यान अस्थिव्यंग प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रिम अवयव वितरण शिबिरातून कृत्रिम हात, पाय बसविणे, कॅलिपर्स यांचे मोजमाप आणि तात्काळ मोफत जागेवर साहित्य वाटप झाल्याने या शिबिरामुळे दिव्यांग व्यक्तींच्या चेहऱ्यावर नवचैतन्य पहावयास मिळाले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !