स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या अमृतवाहिनीच्या विद्यार्थ्याचा गौरव
◻️ संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, डॉ. सुधीर तांबे, शरयू देशमुख यांच्याकडून अभिनंदन
संगमनेर LIVE | अमृतवाहिनी मॉडेल स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे स्पर्धा परीक्षा यश सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जेईई व एमएचटी-सीईटी २०२५ या राष्ट्रीय व राज्यस्तरीय परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्याचा यावेळी गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन द्रोणगिरी सभागृहात करण्यात आले होते.
यावेळी अकॅडेमिक डायरेक्टर डॉ. जे. बी. गुरव, अमृतवाहिनी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आशिष कुमार यांसह मान्यवर उपस्थित होते. शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कला, गुणांना वाव देण्यासाठी अमृतवाहिनी संस्थेत सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन केले जात असते. त्याचाच एक भाग म्हणून स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्याचा सत्कार कार्यक्रम ठेवण्यात आला त्यामुळे इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार आहे.
यावेळी कु. प्रीती रक्ते (पीसीएम गट - ९७.५० टक्के) हिने आपला अभ्यासक्रम, ध्येय निश्चिती व तयारीचा प्रवास विद्यार्थ्यासोबत शेअर केला. कु. सार्थक हासे आणि अफ्फान शेख यांनी इयत्ता १२ वी च्या विद्यार्थ्याना आपल्या अनुभवातून प्रेरणा दिली व परीक्षेला सामोरे जाताना आत्मविश्वास कसा वाढवावा हे सांगितले.
दरम्यान या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, संस्थेचे विश्वस्त डॉ. सुधीर तांबे, संस्थेच्या विश्वस्त शरयू देशमुख, संस्थेचे कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्राचार्य व्ही. बि. धुमाळ, अकॅडेमिक डायरेक्टर डॉ. जे. बी गुरव, प्राचार्य आशिष कुमार, सर्व विभाग प्रमुख व शिक्षकांनी विद्यार्थ्याचे कौतुक केले.