बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून कऱ्हे येथे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित
◻️ ४० एकरावर ६ मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पामुळे गावातली विजेची गरज गावातच भागवली जाणार
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात विकासाच्या पायाभूत सुविधा राबवण्याबरोबर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुका हा विकासाचे मॉडेल बनवला. माजी मंत्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सौर ऊर्जेचे महत्त्व ओळखून ४० एकरावर ६ मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाला असल्याची माहिती देवराम गुळवे, राजू सानप व सुनील सानप यांनी दिली.
या अभिनव उपक्रमाबाबत माहिती देताना ते म्हणाले की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कऱ्हे शिवारामध्ये सौर ऊर्जा प्रकल्प तयार करण्यासाठी तत्कालीन ग्रामपंचायत सरपंच खंडू सानप, उपसरपंच ताई सुनील गुळवे व सर्व सहकाऱ्यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाठपुरावा केला. तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सन २०२२ - २३ मध्ये या कामाला निधी मिळून संबंधित विभागाला तातडीने हे काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या यानुसार १६ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रत्यक्ष या कामाला सुरुवात झाली आणि आता काम पूर्ण होऊन ६ मेगावात सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाला असून संपूर्ण गावाला वीज पुरवली जात आहे.
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली डोंगराच्या पायथ्याशी ४० एकरावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला असून यामधून दररोज ६ मेगावात वीज निर्मिती होत आहे. गावातली विजेची गरज गावातच भागवली जाणार असून यामुळे रोजगार सुद्धा मिळणार आहे. हा अभिनव प्रकल्प राज्याला दिशादर्शक ठरणार आहे.
मनोहर सानप म्हणाले की, सौर ऊर्जेचे मोठे महत्त्व असून गावाने माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली घेतलेला हा निर्णय संपूर्ण तालुक्याला नव्हे तर राज्याला दिशादर्शक ठरणार आहे. या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कामे पाठपुरावा करण्यासाठी भास्कर गुळवे, मनोहर सानप, रोहिदास सानप, मीना सानप, लता सानप, वसंत सानप, देवराम गुळवे, सुभाष सानप, सखाराम किसन सानप, राजू सानप, सुंदराबाई दराडे, भाऊसाहेब सानप, शांताराम घुगे, सिताराम गोसावी, भास्कर तपासे, भीमा हरी तपासे, शरद तपासे, चंदू सानप, भाऊ पाटील सानप, सुखदेव दराडे, भाऊसाहेब उगले, सुनील सानप, संतोष डोंगरे आदींनी पाठपुरावा केला.
भोजपुर चारीही माजी मंत्री थोरात यांच्यामुळे..
यावर्षी मे महिन्यामध्ये चांगला पाऊस झाला जूनमध्ये भोजपुर धरण पूर्ण भरले. हे पाणी आपल्या भागाला मिळावे याकरता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भोजापूर चारीची निर्मिती केली. त्यांनी चारी केली त्यामुळे पाणी आले आहे. त्यामुळे इतरांनी श्रेय घेण्याची केविलवाणी धडपड करू नये असे आवाहन युवक कार्यकर्ते रोहिदास सानप यांनी केले आहे.