आश्‍वी परिसरात तोतया बंटी नंतर तोतया बबलीकडून फसवणुकीचा नवा फंडा!

संगमनेर Live
0
आश्‍वी परिसरात तोतया बंटी नंतर तोतया बबलीकडून फसवणुकीचा नवा फंडा!


◻️ महिला डॉक्टर असल्याचे भासवून घातला मेडीकल व्यावसायिकाला अर्थिक गंडा!



संगमनेर LIVE (आश्‍वी) | “आश्‍वी प्राथमिक आरोग्य केंद्रातुन डाॅ. सविता सोमाणी बोलतेय बाळ मरण पावलय चार हजार पाचशे रुपये ऑनलाइन पाठवा” अशी भावनीक साद घालून शनिवारी संगमनेर तालुक्यातील आश्‍वी बुद्रुक येथील मेडिकल व्यावसायिकाला एका तोतया महिला डॉक्टरने अर्थिक गंडा घातल्याची घटना उघडकीस आली. तर, मागील महिन्यात देखील एका भामट्याने पोलीस बोलत असल्याचे सांगून अनेकांची अर्थिक फसवणूक केली आहे. त्यामुळे आश्‍वी परिसरात बंटी नंतर बबली देखील साधर्म्य असलेला फंडा वापरुन लोकांना गंडा घालत असल्याचे उघड झाल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, “आश्‍वी प्राथमिक आरोग्य केंद्रातुन डाॅ. सविता सोमाणी बोलतेय, बाळ मरण पावलय चार हजार पाचशे रुपये ऑनलाइन पाठवा” अशी भावनीक साद घालणारा फोन शनिवारी (दि. ३० ऑगस्ट) आश्‍वी बुद्रुक येथील तब्बल चार ते पाच मेडिकल व्यावसायिक आणि एका डॉक्टरला देखील आला. यातील एक मेडिकल व्यावसायिकाने विश्‍वास ठेवत माणुसकीचा भावनेतुन स्वता:कडे ऑनलाइन पैसे नसतांना देखील दुसऱ्याकडुन पैसे घेतले आणि महिलेने पाठवलेल्या क्युआरकोड वर ऑनलाईन पैसे पाठवून मदत केली. मात्र, उशीरा पर्यत त्या महिला डॉक्टरचा माणूस पैसे घेऊन न आल्याने फसवणूक झाल्याचे मेडिकल व्यावसायिकांच्या लक्षात आले. 

मागील महिन्यात देखील एक भामटा पोलीस असल्याची बतावणी करुन अशा प्रकारे लोकांची फसवणूक करत असल्याचे उघड झाले होते. त्यामुळे संगमनेर लाईव्ह च्या माध्यमातून लोकांना सावधान राहण्याचे आवाहन करत जनजागृती केल्यामुळे यावेळी आश्‍वी खुर्द येथील मेडिकल व्यावसायिक आणि आश्‍वी बुद्रुक येथील डॉक्टर हे फसवणूकीपासून थोडक्यात बचावले आहेत.

दरम्यान या तोतया महिला डॉक्टरबाबत निमगावजाळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. तय्यब तांबोळी यांच्याशी संपर्क साधून डाॅ. सविता सोमाणी नावाचे डाॅक्टर आहे का? याच्यांबाबत खात्री केली असता, अशा नावाचे कोणी डाॅक्टर कार्यरत नसल्याची माहिती त्यांनी दिली. तर, नागरिकांनी खात्री केल्याशिवाय कोणताही आर्थिक व्यवहार करु नये असे आवाहन संगमनेर लाईव्ह आपणांस करत आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !