संगमनेर शहरात ‘संडे ऑन सायकल स्पर्धे’त शेकडो स्पर्धक सहभागी

संगमनेर Live
0
संगमनेर शहरात ‘संडे ऑन सायकल स्पर्धे’त शेकडो स्पर्धक सहभागी

◻️ आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीत सायकल स्पर्धेचा शुभारंभ

◻️ लहान गटात पृथ्वीराज वाल्हेकर तर, महिला गटात स्वाती सोमण प्रथम

संगमनेर LIVE | राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या संडे ऑन सायकल स्पर्धेच्या लहान मुलांच्या गटात पृथ्वीराज भाऊसाहेब वाल्हेकर मुलींच्या गटामध्ये वेदिका संदीप पानसरे पुरुषांच्या गटात सुयोग मंगेश बैरागी आणि महिलांच्या गटात स्वाती प्रफुल्ल सोमन यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.

क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडाधिकारी तालुका क्रीडा समिती संगमनेर आणि आमदार अमोल खताळ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त भारतीय हॉकी पट्टू मेजर ध्यानचंद यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर बस स्थानकाजवळ आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते लाल झेंडा दाखवून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. 

या वेळी लहान गटाची स्पर्धा १३२ केव्हीपर्यंत तर मोठ्या गटाची घुलेवाडी फाटयापर्यत स्पर्धा घेण्यात आली. विशेष म्हणजे या स्पर्धेत ६८ वर्षीय सेवानिवृत्त शिक्षिका हिराबाई कानवडे यांनी तर पुरुष गटात लिव्हर प्रत्यारोपण केलेले सेवानिवृत्त शिक्षक भानुदास चौधरी यांनी सहभाग घेऊन खेळाडूंची उमेद वाढविली.

लहान गटात प्रथम क्रमांक पृथ्वीराज भाऊसाहेब वाल्हेकर, द्वितीय क्रमांक साई निलेश कोळपकर, तृतीय क्रमांक ध्रुव विकास हासे, चतुर्थ क्रमांक अर्णव विजय निर्मळ, मुलींच्या गटामध्ये प्रथम क्रमांक वेदिका संदीप पानसरे, द्वितीय क्रमांक कल्याणी सोपान निकम, तृतीय क्रमांक हर्षदा विकास भालेराव, चतुर्थ क्रमांक समीक्षा किसन गवांदे, पुरुष गटात प्रथम क्रमांक सुयोग मंगेश बैरागी, द्वितीय क्रमांक भानुदास किसन चौधरी, तृतीय क्रमांक अच्युत उत्तम भालेराव, चतुर्थ क्रमांक निलेश यादव वाकचौरे तसेच महिलांच्या गटात प्रथम क्रमांक स्वाती प्रफुल्ल सोमण, द्वितीय क्रमांक शोभा भाबड, तृतीय क्रमांक हिराबाई बाजीराव कानवडे या सर्वच विजेत्या विद्यार्थ्याना आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ आणि आंतरराष्ट्रीय सायकल पट्टू प्रणिता सोमण यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला तसेच यावेळी स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या शेकडो खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात आले. 

दरम्यान यावेळी जिल्हा व तालुका क्रीडाधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे सेवानिवृत्त क्रीडाशिक्षक नारायण जाधव यांच्या सह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मेजर ध्यानचंद हे हॉकी मधील उत्तम खेळाडू होते. म्हणून त्यांना हॉकीतील जादूगार म्हणून ओळखले जाते. त्यांनी भारताला हॉकीमध्ये सुवर्ण पदक मिळवून दिले. ही आपल्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. या राष्ट्रीय क्रीडा दिनाचे उचित्य साधत क्रीडा विभागाच्या वतीने अगदी कमी वेळेत संगमनेर शहरात या स्पर्धा यशस्वी केल्या. त्या सर्व क्रीडा शिक्षकांचे कौतुक करतो. अशी प्रतिक्रिया आमदार अमोल खताळ यांनी दिली.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !