संगमनेर खुर्दचा कंपोस्ट डेपो कचरामुक्त करणार - आमदार अमोल खताळ

संगमनेर Live
0

संगमनेर खुर्दचा कंपोस्ट डेपो कचरामुक्त करणार - आमदार अमोल खताळ

◻️ संगमनेर खुर्द येथे विविध विकास कामांचा केला शुभारंभ

संगमनेर LIVE | संगमनेर खुर्द येथील कंपोस्ट डेपो मधील  कचऱ्याचे विलगीकरण करून प्रक्रिया करण्यात येत असून कचऱ्यापासून खत निर्मिती सुद्धा करण्यात येत आहे. भविष्यात हा कचरा डेपो भविष्यात  कचरा मुक्त केला जाईल. असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी  व्यक्त केला.

संगमनेर खुर्द येथील यशवंत नगर मध्ये आमदार अमोल खताळ यांच्या स्थानिकविकास निधीतून खांडगाव रोड दत्त मंदिर जवळील ग्रामपंचायत परिसर सुशोभीकरण करणे, वसंतराव नाईक तांडा सुधार योजना वैदुवाडी यशवंत नगर मधील रस्ता काँक्रीटीकरण करणे, जिल्हा नियोजनमधून वैदुवाडी येथील स्मशानभूमी विकास करणे आदी विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.

आमदार खताळ पुढे म्हणाले की, आपल्यावर तालुक्यातील जनतेने विश्वास टाकून मत देऊन विजयी केले. तालुक्यातील विविध विकासाची कामे आपण प्रामुख्याने करणार आहोत. आम्ही पहिले कामे मंजूर करतो निधी देतो आणि नंतर उद्घाटने आणि लोकार्पण करायला येतो. माजी मंत्री स्वर्गीय बी. जे. खताळ यांच्या माध्यमातून या वैदूवाडीला घरे मिळाली आहे. त्यानंतर ४० वर्षानंतर आपल्या माध्यमातून या वाडीच्या विकासासाठी योगदान देण्यात येत आहे.‌ 

या भागात कोणाचा अंगरक्षक तुम्हाला त्रास देत असेल तर, काळजी करू नका त्याची बदली आपण थेट गडचिरोलीला करू! महसूल मंत्र्यांची भेट घेऊन लवकरच जागे बाबतची अडचण दूर करण्यात येईल. तुमच्या भागातील ज्या जमिनी वर्ग दोन च्या आहेत. त्या वर्ग एकच्या करण्यासाठी लवकरात पालक मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून महसूल मंत्र्यांच्या समवेत लवकरच बैठक लावून तुमचा प्रश्न मार्गी लावला जाईल. अशी ग्वाही दिली.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !