रहिमपूर येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त मिरवणूक सोहळ्याचे आयोजन
◻️ मंत्री विखे पाटील, युवा नेते डॉ. विखे पाटील, आमदार अमोल खताळ यांच्यासह दिग्गज राहणार उपस्थित
◻️ उद्या होणाऱ्या कार्यक्रमाची आदिवासी साम्राज्य ग्रुपकडून जय्यत तयारी
संगमनेर LIVE (आश्वी) | ९ ऑगस्ट रोजी जगभरात साजऱ्या केल्या जाणाऱ्या जागतिक आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील रहिमपूर याठिकाणी उद्या रविवारी दि. १० ऑगस्ट २०२५ रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती आयोजक आदिवासी साम्राज्य ग्रुपकडून देण्यात आली.
उद्या रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पार पडणाऱ्या या कार्यक्रमासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, युवा नेते डॉ. सुजय विखे पाटील, संगमनेरचे आमदार अमोल खताळ, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, माजी संचालक बापूसाहेब गुळवे, अकोले येथील मा. उपसभापती मारुती मेगांळ हे उपस्थित राहणार आहेत.
तसेच शांताराम हनुमंता शिंदे यांची भाजपच्या किसान मोर्चा तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी महापुरुषांच्या विचारांचा जागर केला जाणार आहे. त्यामुळे या सोहळ्याची जय्यत तयारी आदिवासी साम्राज्य ग्रुपच्या तरुण कार्यकर्त्याकडून युद्ध पातळीवर सुरू असल्याचे चित्र आहे.
दरम्यान हा भव्य दिव्य सोहळा ‘यांची देही याची डोळां’ अनुभवण्यासाठी शिर्डी मतदारसंघासह संगमनेर तालुक्यातील भारतीय जनता पक्ष व महायुतीच्या सर्व सेलच्या ज्येष्ठ आणि प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यासह पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन आयोजक आदिवासी साम्राज्य ग्रुप आणि स्थानिक ग्रामस्थांनी केले आहे.