आश्वी येथे जैन बांधवांचे पर्युषण पर्व उत्साहात संपन्न
◻️ आठ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमासह क्षमा व मैत्रीचे महत्त्वाचा जागर
संगमनेर (आश्वी) | संगमनेर तालुक्यातील आश्वी येथील जैन धर्म स्थानकात जैन धर्मीयांचा पवित्र असा आठ दिवसीय पर्वाधिराज महापर्व पर्युषण पर्व मध्ये तपोत्सव जप, तप, दान अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
पर्युषण पर्व हे जैन धर्मातील एक महत्त्वाचे व्रत मानले जाते. यालाच पर्वाधिराज महापर्व असे म्हटले जाते. भाद्रपद शुक्ल पंचमीपासुन या व्रताची सुरुवात अखिल भारतीय जैन स्वाध्याय संघाचा सदस्य सौ. सुनंदा उमेश चंडालीया (पिंपळगाव बसवंत), सौ. सारीका राहुल खिंवसरा (नासिक), सौ. कंचन गोकुळ भंडारी (कोपरगाव) यांच्या उपस्थित आश्वी जैन श्रावक संघाचा धर्म स्थानकात सुरु झाले.
या आठ दिवसाचा कालावधीत प्रतिक्रमण, प्रार्थना, जाप, धार्मिक ग्रंथाचे वाचन, प्रवचन, धर्म चर्चा, रात्री प्रतिक्रमण, धार्मिक प्रतियोगात असे विविध धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले.
दरम्यान हे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष सुम्मतीलाल गांधी, संघाचे सर्व सदस्य, महिला मंडळ, कन्या मंडळ, युवक मंडळ आदिनी विशेष परीश्रम घेतले. अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार योगेश रातडीया यांनी कळविली आहे.