आश्‍वी महाविद्यालयात पर्यावरण पूरक श्री गणेश मूर्ती बनविणे कार्यशाळा संपन्न

संगमनेर Live
0
आश्‍वी महाविद्यालयात पर्यावरण पूरक श्री गणेश मूर्ती बनविणे कार्यशाळा संपन्न

◻️ गणेशोत्सवानिमित्त ‘समृद्धीकडून विकासाकडे’ हा उपक्रम 

संगमनेर LIVE (आश्‍वी) | जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, युवा नेते डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून व संस्थेच्या कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे पाटील यांच्या संकल्पनेतून संगमनेर तालुक्यातील आश्‍वी खुर्द येथील कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक शास्त्र महाविद्यालयात गणेशोत्सवानिमित्त पर्यावरण पूरक श्री गणेश मूर्ती बनविणे कार्यशाळा संपन्न नुकतीच संपन्न झाली.

आश्‍वी खुर्द महाविद्यालयात उपक्रमशील, दर्जेदार व संस्कारक्षम शिक्षणाची उज्वल परंपरा नित्यनियमित सुरू आहे. अशा विविध उपक्रमांचा एक वारसा म्हणजे गणेशोत्सव. या गणेशोत्सवानिमित्त ‘समृद्धीकडून विकासाकडे’ हा उपदेश घेऊन व पर्यावरण पूरक श्री गणेशाची मूर्ती बनविणे, विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव देणे, पर्यावरण संवर्धन व सांस्कृतिक वारसा जपणे हेच ध्येय समोर ठेवून महाविद्यालयात शाडूच्या मातीपासून गणपती बनवण्याची कार्यशाळा मोठ्या आनंदमय वातावरणात व उत्साहात पार पडली. 

यावेळी महाविद्यालयातील सर्व सहभागी विद्यार्थ्यानी आपल्या कल्पकतेतून मोठ्या उत्साहाने विविध आकार व प्रकारातील आकर्षक गणेश मूर्ती बनविल्या. यातूनच एक सुंदर आणि उत्कृष्ट गणपतीची मूर्तीची निवड करून तिची प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे.

दरम्यान या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य देविदास दाभाडे यांनी योग्य मार्गदर्शन आणि सूचना दिल्या. मूर्ती बनविण्यासाठी कु. श्रद्धा डहाळे हिने प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच या उपक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दत्तात्रय लोखंडे यांनी केले. प्रा. अश्‍विनी आहेर यांनी आभार मानले. तर, कार्यशाळा यशस्वीतेसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. दिपाली तांबे व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर सेवक यांनी परिश्रम घेतले. अशी माहिती प्रा. गणेश शेळके यांनी कळविली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !