दुर्गापूरच्या उपसरपंच पदी सौ. सुशिला पुलाटे यांची बिनविरोध निवड
◻️ मान्यवरांसह ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव
संगमनेर LIVE (लोणी) | शिर्डी विधानसभा मतदार संघातील दुर्गापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी विखे पाटील प्रणित जनसेवा युवा परिवर्तन मंडळाच्या सौ. सुशिला बापुसाहेब पुलाटे यांची निवड करण्यात आली.
जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील, विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोकनियुक्त सरपंच नानासाहेब अण्णासाहेब पुलाटे यांच्या अध्यक्षेतेखाली झालेल्या विशेष सभेत ही निवड करण्यात आली.
यावेळी पायरेन्सचे माजी अध्यक्ष एम. एम. पुलाटे, आमदार ट्रक वाहतूक संस्थेचे उपाध्यक्ष सुनिल जाधव, अॅड. के. जी. रोकडे, सोपानराव पुलाटे, गंगाधर मनकर, मच्छिद्र जाधव, नानासाहेब गुळवे, अॅड. भाऊसाहेब पुलाटे, लक्ष्मण पुलाटे, सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब पुलाटे, ग्रामपंचायत सदस्य नबाजी हौशिराम रोकडे, सुधाकर शिवाजी पुलाटे, सौ. वर्षा राहुल कदम, सौ. सुनीता शाम बोरसे, सौ. प्रमिला भिमराज पुलाटे, दादासाहेब रामभाऊ मनकर, सौ. सुशीला बापूसाहेब पुलाटे, मुकेश बाळासाहेब तांबे आणि सौ. शालिनी कैलास सातपुते, जनसेवा युवा परिवर्तन मंडळाचे कार्यकर्ते व गावतील आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान याप्रसंगी निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी संदिप शिंदे आणि रविंद्र गुंजाळ यांनी काम पाहीले. तर, निवडीनंतर मान्यवरांसह ग्रामस्थांनी सौ. सुशिला पुलाटे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.