लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते मानाच्या गणपतीचे पूजन
◻️ पर्यावरण पूरक गणेशोत्सव हे संगमनेरच्या गणपतीचे वैशिष्ट्य - बाळासाहेब थोरात
◻️ संगमनेर शहरात मोठ्या उत्साह आणि आनंदात गणेश विसर्जन मिरवणुका
संगमनेर LIVE | दहा दिवस अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये संगमनेर शहरांमध्ये विविध गणेश मंडळांनी जय्यत तयारी करून गणेशोत्सव साजरा केला. १३० वर्षाची समृद्ध परंपरा असलेल्या रंगार गल्ली येथील मानाच्या सोमेश्वर गणपतीचे पूजन परंपरेप्रमाणे लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते संपन्न झाले. याचबरोबर संगमनेर शहरातील सर्व गणेश भक्तांनी एकत्र येऊन मोठ्या आनंदाने गणेश विसर्जन मिरवणुका साजरा केल्या. श्रद्धेने आणि आनंदाने पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरी करण्याची परंपरा गणेश भक्तांनी जपली असल्याचे गौरवद्गार ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी काढले.
शहरातील रंगारगल्ली येथील मानाच्या सोमेश्वर गणपतीचे पूजन परंपरेप्रमाणे बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाले. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजीत तांबे, राजेश मालपाणी, सौ. दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, डॉ. मैथिलीताई तांबे, सोमेश्वर मंडळाचे मार्गदर्शक जयंत पवार, किशोर पवार, अध्यक्ष अनिल आमले, उपाध्यक्ष अक्षय ढोरे, अमोल डुकरे, संकेत राजेंद्र काजळे, देवेंद्र काळे, कैलास बोरसे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, बाळासाहेब देशमाने, सौ. योगिता पवार, शुभम आमले, योगेश काजळे, वैभव आमले, प्रसाद आमले, रोहित बोरसे, श्रीराज गोंगे, शुभम परदेसी, अमित बोरसे, कुंजल कांबळे, कमलेश असावा, निखिल डुकरे, सोनू भिंगरे शहरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सोमेश्वर देवस्थानचे पूजन बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजीत तांबे यांनी केले. यानंतर पारंपारिक प्रथेप्रमाणे गणपतीची आरती व पूजन करण्यात आले. मर्दानी खेळ, लाठीकाठी, ढोल ताशांचा गजर, आकर्षक व्यवस्था, शहरातील नागरिकांची भव्य उपस्थिती आणि सर्व धर्म समभाव आणि मानवतेचा संदेश देणारी परंपरा हे या मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरले.
यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, सोमेश्वर मानाच्या गणपतीला १३० वर्षाची परंपरा आहे. सर्वधर्म समभाव व सर्व समाजाचे लोक एकत्र येऊन मोठ्या आनंदाने श्रद्धेने गणेशोत्सव साजरी करतात ही परंपरा आपण कायम जपली आहे. २००२ मध्ये निर्णय घेऊन पर्यावरण पूरक गणेश मिरवणूक करण्याचा निर्णय या मंडळांनी घेतला आणि गुलाल आणि डीजेला बंदी घालत आरोग्यदायी अशी मिरवणूक आपण सुरू केली.
दरवर्षी सकाळी आठ वाजता ही मिरवणूक सुरू होते. सर्व गणेश भक्त मोठ्या आनंदाने एकत्र येतात एकमेकाचा आदर करतात. यशस्वी आयोजन करणारे हे मंडळ असून अशा सांस्कृतिक महोत्सवात राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्वानी एकत्र यावे असे आवाहन त्यांनी केले. याचबरोबर संगमनेरचा विकास शांतता समृद्धता आणि व्यापार ही वाटचाल चांगली राहिली पाहिजे यासाठी सर्वानी काम करावे असे आवाहन त्यांनी केले.
याचबरोबर सध्या राज्यामध्ये देशांमध्ये जातीभेद आणि मनभेद सुरू असून होणारे राजकारण हे दुर्दैवी आहे. सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी राजकारण करायचे असून गणेशोत्सवानिमित्त राज्यातील, देशातील सर्व नागरिक सुखी होऊ दे मानवता अधिक बळकट होऊ दे आणि समृद्ध राष्ट्र निर्माण होऊ दे अशी प्रार्थना बाळासाहेब थोरात यांनी केली.
आमदार सत्यजीत तांबे म्हणाले की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहर व तालुका हे सांस्कृतिक शहर म्हणून राज्य पातळीवर नावाजलेले आहे. शहरातील विविध गणेश मंडळांनी यावर्षी त्यांच्या चालीरीती व परंपरा जपत गणेशोत्सव साजरा केला आहे. २००२ पासून सोमेश्वर गणेश मंडळ हे सकाळी आठ वाजता मिरवणूक सुरू करते आणि त्या पाठोपाठ सर्व गणपतीची मिरवणूक होते. शांतता आणि सद्भावना ही संगमनेरचे वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, सर्वानी एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा संगमनेर करांनी जपली आहे. दहा दिवस आनंदाने सर्वजण एकत्र होते. आपल्या समाजाला समृद्ध परंपरा व चालीरीती असून यातून मानवता धर्म वाढीचे काम आपल्या सगळ्यांना करायचे आहे. आरोग्यदायी व पर्यावरण पूरक गणेशोत्सव हे या वर्षीच्या वैशिष्ट्य असल्याचे त्या म्हणाल्या.
डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, गणेश उत्सवाचा मूळ हेतू हा सर्वानी एकत्र येणे हा आहे. समृद्ध राष्ट्र आणि देश निर्माण करण्यासाठी या एकतेचा वापर युवकांनी करावा असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान याप्रसंगी मंडळाच्या वतीने अध्यक्ष अनिल आमले यांनी सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी सोमेश्वर मंडळाचे मयूर जाधव, साईराज शेरे, साईराज पाटणकर, कृष्णा असावा, शंतनू नवले, ओम परदेशी, परिश्रम काळन, सार्थक मिसाळ, विनायक भोईर, स्वाती मिसाळ, ओम कांबळे, अकबर चौधरी, नरेंद्र बोरसे, सचिन लोणारी उपस्थित होते. मर्दानी खेळ आणि लाठीकाठी यावेळी उपस्थित त्यांनी मोठी गर्दी केली. संगमनेर शहरात अत्यंत शांततेने सर्व गणेश भक्तांनी मिरवणुका संपन्न केल्या.