पु. लं. देशपांडे यांच्या ‘मी सुंदर होणार’ नाटकाने संगमनेरकर भारावले

संगमनेर Live
0
पु. लं. देशपांडे यांच्या ‘मी सुंदर होणार’ नाटकाने संगमनेरकर भारावले

◻️ लोकनेते बाळासाहेब थोरात यांचा सर्व कलाकारांना मोठा आदर - अभिजीत चव्हाण

◻️ थोरात सहकारी साखर कारखान्यावर गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम

संगमनेर LIVE | कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी यशवंतराव चव्हाण यांचा समृद्ध वारसा जपताना कायम संत आणि कलावंतांचा सन्मान केला आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने गणेशोत्सव काळामध्ये विविध दर्जेदार कार्यक्रमांच्या आयोजनाची परंपरा जपली असून लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या व्यक्तिमत्त्वाचा मराठी चित्रपट सृष्टीतील सर्व कलाकारांना मोठा आदर असल्याचे सिने अभिनेते अभिजीत चव्हाण यांनी म्हटले. यावेळी पु. ल. देशपांडे यांच्या ‘सुंदर मी होणार’ या नाटकाने संगमनेरकरांना मंत्रमुग्ध केले.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर अमृत सांस्कृतिक मंडळाच्या वतीने गणेशोत्सवाच्या निमित्त ‘सुंदर मी होणार’ या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पु. ल. देशपांडे यांच्या २५ व्या स्मृतिदिनानिमित्त व सुनिता ताई देशपांडे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त अमृत सांस्कृतिक मंडळाच्या वतीने ‘सुंदर मी होणार’ हा हा हृदय हेलवणारा नाट्यप्रयोग झाला.

भारतीय स्वातंत्र्यानंतर विविध संस्थाने खालसा झाली. यामध्ये एक संस्थान खालसा झाल्यानंतर त्या राजघराण्यातील पद्धती, मुलांवरील बंधने आणि यामुळे मुलांची झालेली घुसमट, त्यातून विराजस ओढेकर, सुरजन देशपांडे यांनी केलेले बंड, वडिलांचे आपल्या अपंग सुजा प्रभू देसाई मुलीवर असलेले प्रेम आणि अद्यापही राज परिवाराच्या अविर्भावात वावरणारे खालसाधिपती यांचा कार्यकाळ अत्यंत सुंदर पद्धतीने दाखवण्यात आला. आई वारल्यानंतर त्या मुलांच्या संगोपरासाठी डॉक्टरच्या भूमिकेत विद्याधर जोशी यांनी केलेली भूमिका आणि अत्यंत कारखानपणे राजाची भूमिका करणारे अभिजीत चव्हाण यांच्या भूमिका वाखाण्याजोगे होत्या. हृदय हेलावून टाकणाऱ्या या नाटकातील अभिनय संवाद वेशभूषा लाईट इफेक्ट यामुळे सर्व रसिक मंत्रमुग्ध झाले.

या नाटकात ज्येष्ठ अभिनेते विद्याधर जोशी, अभिजीत चव्हाण, स्वानंदी टिकेकर, अमोल बावडेकर, सुजन देशपांडे, श्रुती पाटील, विराजस ओढेकर, आस्ताद काळे, सुरजा प्रभू देसाई या दिग्गज कलाकारांनी अत्यंत सुंदर भूमिका केल्या.

यावेळी बोलताना लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, पु. ल. देशपांडे हे महाराष्ट्राला लाभलेले वरदान आहे. नाटकातील प्रत्येक संवाद हा हृदयाला हात घालणार आहे. नाटक ही जिवंत कला असून राज्यभरातील दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम होतो आहे. संगमनेर शहर आणि तालुक्यात मोठ्या आनंदाने गणेश उत्सव पर्व साजरे होत असून अमृत सांस्कृतिक मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन या ठिकाणी केले जाते. संगमनेरातील रसिकांसाठी ही मोठी पर्वणी ठरत असल्याचे ते म्हणाले.

प्रसिद्ध अभिनेते अभिजीत चव्हाण म्हणाले की, यशवंतराव चव्हाण यांचा वारसा लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी जपला आहे. संत कलावंतांचा त्यांनी कायम आदर केला आहे. नाटक हे मुंबई पुणे या मेट्रो शहरांपुरते मर्यादित न राहता आता जिल्हा आणि तालुका स्तरापर्यंत लोकांची मागणी वाढली आहे. मात्र सोशल मीडियाच्या जमान्यात काळ बदलला आहे. तरुण पिढी नाटकाकडे कमी येत आहे. सध्याच्या काळात अनेक साखर कारखान्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन बंद केले आहे अशा काळातही थोरात सहकारी साखर कारखान्याने लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मात्र आपली समृद्ध परंपरा जपली असून विविध दर्जेदार कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी आयोजन केले जात असल्याचा आम्हा सर्वांना अभिमान असल्याचे त्यांनी म्हटले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर रामदास तांबडे यांनी आभार मानले. यावेळी कारखाना परिसरासह संगमनेर मधील अनेक नागरिक महिला व तरुण नाटक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !