मांचीहिल शैक्षणिक संकुलातील गणरायाला ढोल - ताशांच्या गजरात निरोप

संगमनेर Live
0
मांचीहिल शैक्षणिक संकुलातील गणरायाला ढोल - ताशांच्या गजरात निरोप

◻️ अश्‍व रथातील गणराय आणि विद्यार्थ्याचे गणेश वंदना नृत्य ठरले मिरवणुकीचे आकर्षण

संगमनेर LIVE (आश्‍वी) | संगमनेर तालुक्यातील मांची हिल शैक्षणिक संकुलात सालाबादप्रमाणे याही वर्षी विविध विभागामध्ये पाच दिवसीय गणरायाची मोठ्या भक्तिभावाने विधिवत पुजा अर्चा करत स्थापना करण्यात आली. यावेळी ढोल ताशांच्या गजरात पारंपारिक पद्धतीने मिरवणुक काढून गणरायांचे आगमन झाले होते. पाचही दिवस प्रत्येक विभागात सकाळ आणि संध्याकाळी विविध क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या मान्यवरांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली.

या उत्सव कालावधीत संकुलातील विविध विभागांमध्ये रक्तदान शिबीर, क्रीडा स्पर्धा, विविध गुणदर्शन कार्यक्रम असे विविध उपक्रम राबविण्यात आले. अश्‍विन ग्रामीण आयुर्वेद रुग्णालय व महाविद्यालय, अश्‍विन कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ज्ञानगंगा विद्यानिकेतन, सूर्या नर्सिंग महाविद्यालय, ए. पी. जे. अब्दुल कलाम आयटीआय महाविद्यालय, एकलव्य अध्यापक विद्यालय, महाराजा यशवंतराव होळकर पब्लिक स्कूल या सर्व विभागात पाच दिवसीय गणेशाची स्थापना करण्यात आली होती.

सोमवारी (१ सप्टेंबर) दुपारपासून पारंपरिक वाद्याच्या गजरात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. प्रत्येक विभागातील गणपती मुख्य चौकात एकत्र आल्यानंतर मिरवणुक सुरु झाली. बालवाडीपासून तर वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यापर्यत सर्वच जण मिरवणुकीत दंग होऊन गेले. अश्‍विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालयाच्या गणपतीची सजवलेल्या अश्‍व रथातील मिरवणूक व विद्यार्थ्यानी सादरीकरण केलेले गणेश वंदना हे नृत्य हे मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले. महाविद्यालयाची श्रीराम व हनुमानासह असलेली अतिशय देखणी व भव्य गणेशमूर्ती सर्वाचे लक्ष वेधून घेत होती. सायंकाळी ६ वाजता प्रवरा डाव्या कालव्यामध्ये गणपती मूर्तीचे भक्तीभावाने विसर्जन करण्यात आले. 

दरम्यान याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक यांच्यासह सर्व विभागाचे प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तर, यावेळी अश्‍विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालयाच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी संसदेसह संकुलातील सर्व विद्यार्थ्यानी विशेष परिश्रम घेतले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !