निंभेरे शिवारात निळवंडे धरणाचा उजवा कालवा फुटला
◻️ पंचक्रोशीतील गावांमध्ये पावसाच्या थैमानामुळे शेतकरी हवालदिल
संगमनेर LIVE (आश्वी) | राहुरी तालुक्यातील निंभेरे येथे निळवंडे धरणाचा उजवा कालवा धो-धो कोसळणाऱ्या पावसाच्या प्रचंड दबावामुळे फुटल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
निळवंडे कालव्याचा भराव वाहून गेल्यामुळे पाणी वडनेरकडे वाहून गेल्यामुळे निंभेरे येथील शेतपिकांचे नुकसान टळले असून कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही. परंतु भविष्यातील धोका ओळखून पाटबंधारे विभागाने तातडीने भक्कम दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
घटनेची माहिती मिळताच सरपंच शांताराम सिनारे, माजी सभापती भीमराज हरदे, तंटामुक्ती अध्यक्ष विष्णू सिनारे, कामगार पोलीस पाटील बाळकृष्ण हारदे, सचिव माधव हारदे, शहाजी हारदे, राजेंद्र हारदे, चांगदेव हारदे, गोरख साबळे, कॉन्ट्रॅक्टर चोपडे यांच्यासह ग्रामस्थानी घटनास्थळी धाव घेतली होती.
दरम्यान यावेळी ग्रामस्थांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार शिवाजी कर्डिले यांच्याकडे तातडीने कालवा दुरुस्तीची मागणी केली आहे.