उमाजी नाईक यांचे विचार तरुण पिढीने आचरणात आणावे - आमदार अमोल खताळ
◻️ चंदनापुरी, सावरगावतळ, सायखिंडी येथे राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी
संगमनेर LIVE | आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांना फक्त एका रामोशी समाजा पुरते मर्यादित न ठेवता तर समाजांना सुद्धा त्यांचा पराक्रम समजला पाहिजे यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. नुसती त्यांची जयंती साजरी करून उपयोग नाही तर, त्यांचे आचार आणि विचार आजच्या तरुण पिढीने आचारनात आणावी. असा संदेश आमदार अमोल खताळ यांनी दिला.
संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी, सावरगावतळ (शिरतार वस्ती) आणि वेल्हाळे येथे आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांची जयंती निमीत्त आमदार अमोल खताळ यांनी अभिवादन केले. यावेळी त्यांनी राजे उमाजी नाईक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
आमदार अमोल खताळ म्हणाले की, ब्रिटिश राजवटीच्या विरोधात लढा देणारे पहिले आद्य क्रांतिकारक म्हणून उमाजी नाईक यांना ओळखले जात आहे. जर यदा कदाचित त्यांना पकडले गेले असते तर आपल्याला स्वातंत्र्य लवकर मिळाले नसते. त्यांच्या बलिदानातूनच खऱ्या अर्थाने आपल्याला लवकर स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यांनी स्त्रियांसाठी सामाजिक आधार निर्माण केला. तसेच अन्यायाविरुद्ध लढा दिला. त्यांचा पराक्रम हा फक्त रामोशी समाजा पुरता न राहता त्यांचा इतिहास व पराक्रम इतर सर्वच समाजांपर्यंत पोहोचवण्याची नितांत गरज आहे. 
आजपर्यत काहींनी या या रामोशी समाजाचा वापर फक्त राज कारणासाठी केला गेला. मात्र आपण या समाजाच्या पाठीमागे भक्कम उभे राहू असा विश्वास व्यक्त करत ते म्हणाले की, आपण त्यांच्यावर नुसती टीकाटिप्पणी न करता त्यांना विकास कामाच्या माध्यमातून उत्तर देणार आहे. या समाजातील मुलांनी चांगले शिक्षण घेऊन उच्चधिकारी व्हावे यासाठी जी काही मदत लागेलं ती दिली जाईल. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यात देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे सरकार आहे. जिल्ह्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि संगमनेरा महायुतीचा आमदार असल्यामुळे या तालुक्यामध्ये विकासाची गंगा वाहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 
दरम्यान हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंदनापुरी येथील जय मल्हार क्रांती संघटनेचे कार्यकर्ते तसेच सावरगाव तळ, शिरतार वस्ती येथील सर्व तरुण तसेच सायकलने येथील उमाजी राजे नाईक प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
चंदनापुरीत सभागृहाला निधी मंजूर मात्र, ग्रामपंचायतीचा जागा देण्यास नकार
तालुक्यातील चंदनपुरी येथे रामोशी समाज बांधवांच्या सभागृहासाठी आमदार निधीतून या अगोदरच आपण १० लाख  लाख रुपये दिले होते. परंतु हे सभागृह उभारण्यासाठी याच गावातील काही झारीतील शुक्राचार्यानी या सभागृहासाठी जागा देण्यास नकार दिला आहे. परंतु, त्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी तुम्ही एकत्रित येणे गरजेचे आहे, असे आवाहन केले.
हिवरगाव पावसा येथे राजे उमाजी नाईक स्मारकासाठी २० लाख..
ब्रिटिशांच्या विरोधात लढा देणारे आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांचे हिवरगाव पावसा येथे स्मारक व्हावे अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या स्मारकासाठी २० लाख रुपयांचा निधी देण्याचे जाहीर केले आहे. हिवरगाव पावसा येथे जागा उपलब्ध होतात याच माणसाचे काम सुरू केले जाईल. असे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.
 
