महायुतीकडून नगराध्यक्ष पदासाठी सुवर्णा खताळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल
◻️ महायुतीच्या उमेदवारांना शहराचा रखडलेला विकास करण्यासाठी साथ देण्याचे केले आवाहन
संगमनेर LIVE | संगमनेर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी प्रांताधिकारी कार्यालयामध्ये उमेदवारी दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती. नगराध्यक्ष पदासाठी महायुतीकडून आमदार अमोल खताळ यांच्या भाऊजय सुवर्णा विठ्ठल राहणे (सुवर्णा संदीप खताळ) यांनी अर्ज दाखल केला.
यावेळी आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रांताधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णाताई रहाणे - खताळ म्हणाल्या की, मागील विधानसभा निवडणुकीत तुम्ही सर्वानी जो विश्वास ठेवला तोच विश्वास नगरपालिका निवडणुकीत सुद्धा ठेवा. महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करून शहराचा रखडलेला विकास करण्यासाठी महायुतीला साथ द्या. असे आवाहन केले.
सौ. नीलम खताळ म्हणाल्या की संगमनेर शहरातील पाण्याचा आणि रस्त्याचा प्रश्न सोडून इतरही प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे जसा विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीवर विश्वास ठेवला तसाच विश्वास या नगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा महायुतीवर ठेवा. असा विश्वास व्यक्त केला.