संकल्प नव्या वर्षाचा, ध्यास संगमनेरच्या विकासाचा!
◻️ आमदार अमोल खताळ यांच्याकडून जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा!
संगमनेर LIVE | येणारे नवीन वर्ष हे प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समाधान, आनंद आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो, अशा शब्दांत आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर मतदारसंघातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. मतदारसंघाच्या सर्वागीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.
आमदार खताळ यांनी आगामी वर्षातील आपल्या कार्याची दिशा स्पष्ट करताना सांगितले की, मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेने दिलेला विश्वास आणि दाखवलेले प्रेम हीच माझ्या कामाची खरी ऊर्जा आहे. येणाऱ्या काळात संगमनेर तालुक्याचा सर्वागीण विकास साधताना प्रामुख्याने शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याला आणि सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल.
यासोबतच, महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि ग्रामीण भागातील रस्ते, पाणी व आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावून सामान्य नागरिकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी आपण अधिक जोमाने प्रयत्न करणार आहोत. अशी ग्वाही दिली.
आमदार खताळ म्हणाले की, “नवीन वर्षामध्ये संगमनेर तालुक्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रत्येक समाजघटकाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे. विकासाच्या प्रवासात मी सदैव जनतेच्या सोबत राहीन. तसेचसंगमनेरच्या जनतेसाठी आनंदाचे आणि समृद्धीचे वर्ष लाभो, हीच सदिच्छा! अशा शब्दांत त्यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.