नाशिक - पुणे रेल्वे मार्गासाठी सर्वपक्षीय नेत्यांचा एल्गार!

संगमनेर Live
0
नाशिक - पुणे रेल्वे मार्गासाठी सर्वपक्षीय नेत्यांचा एल्गार!

◻️ नाशिक - पुणे पट्ट्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची महत्त्वाची बैठक संगमनेर येथे संपन्न 


​संगमनेर LIVE | नाशिक - पुणे रेल्वे मार्ग हा ‘नाशिक - सिन्नर - संगमनेर - अकोले - नारायणगाव - राजगुरुनगर - चाकण’ या प्रस्तावित मार्गानेच झाला पाहिजे, या मागणीसाठी उत्तर नगर जिल्हा आणि नाशिक - पुणे पट्ट्यातील लोकप्रतिनिधींनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. या जनआंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज संगमनेर येथे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची महत्त्वाची बैठक पार पडली.

या ​बैठकीत ठरल्यानुसार, आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून सर्व लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. या भेटीत संगमनेर - अकोले मार्गाच्या तांत्रिक आणि सामाजिक महत्त्वावर चर्चा केली जाईल.

​मात्र, केवळ चर्चेने प्रश्न सुटला नाही, तर आंदोलनाचे दुसरे पाऊल उचलले जाईल. चाकण किंवा आळेफाटा येथे ‘बेमुदत रस्ते जाम’ करून सरकारचे लक्ष वेधण्याचा कडक इशारा या बैठकीत सर्वानुमते देण्यात आला.

यावेळी ​आमदार सत्यजीत तांबे यांनी या बैठकीचे प्रास्ताविक करत भूमिकेचे महत्त्व विषद केले. डॉ. अजित नवले यांनी संवाद आणि आंदोलन या दोन्ही मार्गाचा अवलंब करण्याची गरज व्यक्त केली. 

या बैठकीत ऑनलाईन आणि प्रत्यक्ष माध्यमातून ​खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, सदाशिवराव लोखंडे, ​आमदार शरद सोनवणे, आमदार किरण लहामटे, आमदार बाबाजी काळे, माजी आमदार अतुल बेनके, देवदत्त निकम, सत्यशील शेरकर, सौ. नीलमताई खताळ, उत्कर्षा रूपवते, उदय सांगळे, कॉ. कारभारी नवले, बाजीराव दराडे, कपिल पवार, दत्ता ढगे आदि उपस्थित होते.

​या रेल्वे मार्गाचे महत्त्व

​नाशिक - पुणे रेल्वे मार्ग (सिन्नर - संगमनेर - नारायणगाव मार्गे) हा केवळ प्रवासाचे साधन नसून या भागाच्या आर्थिक प्रगतीची जीवनवाहिनी ठरणार आहे. संगमनेर आणि अकोले हा भाग शेती आणि दुग्धव्यवसायात अग्रेसर आहे. हा मार्ग झाल्यास इथला भाजीपाला, दूध आणि इतर शेतीमाल थेट मुंबई - पुण्यासारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये जलद गतीने पोहोचू शकेल. तसेच, चाकण आणि नाशिक या दोन औद्योगिक शहरांना जोडल्यामुळे रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण होतील. दुर्गम भागातील विद्यार्थ्यासाठी आणि नोकरदारांसाठी हा सुरक्षित आणि स्वस्त प्रवासाचा पर्याय ठरेल, ज्यामुळे संपूर्ण उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती मिळणार असल्याने रेल्वे मार्गासाठी सर्वजण एकवटले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !