नगरमध्ये ‘रस्ता सुरक्षा अभियाना’अंतर्गत ११४ जणांवर धडक कारवाई!

संगमनेर Live
0
नगरमध्ये ‘रस्ता सुरक्षा अभियाना’अंतर्गत ११४ जणांवर धडक कारवाई!


◻️​ पत्रकार चौकात नाकाबंदी; ८ हजार ८०० रुपयांचा रोख दंड जागीच वसूल 


संगमनेर LIVE (​नगर) | राज्यात रस्ता सुरक्षा अभियान २०२६ राबवले जात असून, त्यानिमित्त आज २० जानेवारी रोजी नगर शहरातील पत्रकार चौक येथे शहर वाहतूक शाखेच्या वतीने मोठी नाकाबंदी करण्यात आली. या कारवाईत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ११४ वाहनधारकांवर दणका देण्यात आला असून, त्यांना रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शनही करण्यात आले.

​आजच्या या नाकाबंदी दरम्यान विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने विना सीट बेल्ट प्रवास करणारे ५ चालक, वाहने चालवताना मोबाईलवर बोलणारे ५ जण, काळ्या काचा लावलेली २ वाहने, विना लायसन्स वाहन चालवणारा १ चालक, तसेच विना नंबर प्लेट असलेली तब्बल २३ वाहने आणि ध्वनिप्रदूषण करणाऱ्या फटाका सायलेन्सरच्या २ केसेस करण्यात आल्या. याशिवाय मोटार वाहन कायद्यातील इतर कलमान्वये ७३ केसेससह एकूण ११४ जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या मोहिमेत ८,८०० रुपये रोख दंड जागीच वसूल करण्यात आला असून, ६९,५०० रुपयांचा थकीत (अनपेड) दंडही या कारवाईत आकारण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. 

शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक शमुवेल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र घायतडक, मन्सुर सय्यद, सहायक फौजदार संजय घोरपडे आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली. या पथकात पोलीस हवालदार गणपत कर्डीले, विष्णू खेडकर, विनायक कांबळे, अमोल घंगाळे, ज्ञानेश्वर खराडे, बाप्पू उंडे, अजय जपकर, मधुकर ससे, संदिप शेंडगे, दिशान शेख, सुभाष गावडे आणि महेश घोरपडे यांनी चोख कामगिरी बजावली आहे.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !