धांदरफळ परिसराचा वीजप्रश्न आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्यामुळे सुटणार

संगमनेर Live
0
धांदरफळ परिसराचा वीजप्रश्न आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्यामुळे सुटणर 

◻️​ महायुती कार्यकर्त्याच्या उपस्थितीत नवीन ट्रान्सफॉर्मरचा शुभारंभ

​संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील धांदरफळ आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा असलेला विजेचा प्रश्न आता मार्गी लागला आहे. धांदरफळ वीज उपकेंद्रावरील ट्रान्सफॉर्मरची क्षमता ५ एमव्हीए (MVA) वरून वाढवून १० एमव्हीए करण्यात आली असून, महायुतीच्या स्थानिक कार्यकर्त्याच्या उपस्थितीत या वाढीव क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरचा नुकताच दिमाखात शुभारंभ करण्यात आला.

धांदरफळ परिसरात गेल्या काही काळापासून विजेची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली होती. परिणामी, वीजपुरवठा वारंवार खंडित होणे आणि कमी दाबाने (Low Voltage) वीज मिळणे अशा समस्यांमुळे नागरिक आणि विशेषतः शेतकरी हैराण झाले होते. शेती पिकांना पाणी देताना येणाऱ्या या तांत्रिक अडचणींमुळे उत्पादनावरही परिणाम होत होता. ही बाब लक्षात घेता आमदार अमोल खताळ यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच महावितरणने ट्रान्सफॉर्मरची क्षमता दुप्पट करण्यास मंजुरी दिली.

या नवीन आणि वाढीव क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरमुळे आता धांदरफळसह परिसरातील गावांना विनाखंड आणि पूर्ण दाबाने वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. यामुळे शेती कामांना गती मिळणार असून घरगुती ग्राहकांनाही दिलासा मिळणार आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल मिलिंद खताळ, उमेश कोकणे, बाळासाहेब खताळ, अमोल खताळ, सुरज खताळ, पियुष ठोंबरे, सर्वेश गुंजाळ, विकास खताळ यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.

यावेळी महावितरणच्या धांदरफळ वीज उपकेंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हा ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी विशेष मेहनत घेतली. यामध्ये महादेव गुरसाळी, सचिन गभणे, कैलास कुदळ आणि अनिल डुबे यांच्या योगदानाचे ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.

दरम्यान ​आमदार अमोल खताळ यांनी दाखवलेली तत्परतेमुळे वीजेचा प्रश्न सुटणार असल्याने परिसरातील नागरिकांनी त्यांचे विशेष आभार मानले आहेत.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !