राहुरी पोटनिवडणुकीसाठी वंचितकडून आदिवासी तरुण कार्यकर्त्याला उमेदवारी!

संगमनेर Live
0
राहुरी पोटनिवडणुकीसाठी वंचितकडून आदिवासी तरुण कार्यकर्त्याला उमेदवारी!

◻️संघर्षशील कार्यकर्त्याला विधानसभेची संधी; निवडणूक रंगतदार होणार

संगमनेर LIVE (​राहुरी) | राहुरी या विधानसभा मतदारसंघांच्या आगामी पोटनिवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. वंचित बहुजन आघाडीने या निवडणुकीत एका सामान्य पण अत्यंत संघर्षशील चेहऱ्याला संधी देण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. जिल्हा कार्यकारिणीच्या संयुक्त बैठकीत अनिल भिकाजी जाधव या तडफदार आदिवासी तरुण कार्यकर्त्याची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे.

​नगर दक्षिण आणि उत्तर जिल्ह्यांच्या संयुक्त बैठकीत पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अनिल जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. कार्यकर्त्याच्या मते, अनिल जाधव हे केवळ एक उमेदवार नसून, ते गोरगरीब, कष्टकरी आणि शोषित घटकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढणारे नेतृत्व आहेत. त्यांच्या या निष्ठेची आणि कार्याची दखल घेत पक्षाने त्यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.

​या निर्णयाबाबत माहिती देताना वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. डॉ. अरुण जाधव म्हणाले की, “आजवर या मतदारसंघात केवळ प्रस्थापितांनाच संधी देण्याची परंपरा होती. मात्र, आता वेळ बदलली आहे. संविधान जिवंत ठेवण्यासाठी आणि जातीवादी मानसिकतेला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही एका सामान्य कुटुंबातील संघर्षशील कार्यकर्त्याला उमेदवारी दिली आहे. ही निवडणूक प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी असेल.”

​अनिल जाधव यांच्या उमेदवारीमुळे या मतदारसंघातील पारंपारिक राजकीय गणिते बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः तरुण वर्ग आणि शोषित घटकांमध्ये या निर्णयामुळे उत्साहाचे वातावरण असून, प्रस्थापित उमेदवारांसमोर आता एका नव्या आव्हानाचे स्वरूप उभे ठाकले आहे.

दरम्यान ​वंचित बहुजन आघाडीने मतदारसंघातील सर्व जनतेला, विशेषतः कष्टकरी आणि वंचित घटकांना आवाहन केले आहे की, त्यांनी एकदिलाने काम करून अनिल जाधव यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे आणि परिवर्तनाची ही लाट विधानसभेपर्यंत पोहोचवावी, असे म्हटले आहे..
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !