आई तुळजाभवानीला महिला भाविकाकडून ५१ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र अर्पण

संगमनेर Live
0
आई तुळजाभवानीला महिला भाविकाकडून ५१ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र अर्पण

◻️ मंदिर संस्थानकडून महिला भाविकांच्या दातृत्वाचा गौरव

संगमनेर LIVE (​तुळजापूर) | साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या श्री क्षेत्र तुळजापूर येथे आज भक्ती आणि दातृत्वाचा अनोखा संगम पाहायला मिळाला. पुणे जिल्ह्यातील सोरपटवाडी येथील एका महिला भाविकाने आपल्या कुटुंबासह देवीचे दर्शन घेऊन, कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी तब्बल ५१.८४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण केले आहे.

देवस्थानने दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील गणेश नगर (सोरपटवाडी) येथील रहिवासी मनिषा अंकुश धामे या आज आपल्या कुटुंबासह श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे आल्या होत्या. सकाळी देवीचे विधीवत दर्शन आणि पूजा केल्यानंतर, मनिषा धामे यांनी भक्तीभावापोटी ५१.८४० ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र मंदिर संस्थानकडे सुपूर्द केले.

​यावेळी धार्मिक विभागाचे विकास वाणी, महेश गंजे तसेच मंदिर संस्थानचे अन्य कर्मचारी उपस्थित होते. मंदिर संस्थानच्या वतीने धामे परिवाराचा सन्मान करण्यात आला आणि त्यांच्या दातृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !