उपमुख्यमंत्र्यांनी केला ‘धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्षा'चा शुभारंभ!

संगमनेर Live
0
उपमुख्यमंत्र्यांनी केला ‘धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्षा'चा शुभारंभ!

◻️ संगमनेराच्या प्रश्नांना आता मिळणार हक्काचे व्यासपीठ

​संगमनेर LIVE | सामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि शासकीय योजनांचा लाभ थेट जनतेपर्यत पोहोचवण्यासाठी संगमनेर शहरात शिवसेना महायुतीचे आमदार अमोल खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात ‘धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्षा’चा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला.

​अनेकदा शासकीय प्रक्रियेतील गुंतागुंतीमुळे सामान्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. ही अडचण ओळखून, नागरिकांना शासकीय योजनांची अचूक माहिती देणे, अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शन करणे आणि संबंधित विभागांशी समन्वय साधून प्रश्न त्वरित मार्गी लावणे, हा या सहाय्यता कक्षाचा मुख्य उद्देश आहे.

​यावेळी नेवासेचे आमदार विठ्ठलराव लंघे, सामाजिक कार्यकर्त्या नीलम खताळ यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत हा कक्ष जनतेसाठी आधारवड ठरेल, असा विश्‍वास व्यक्त केला.

​या नूतन सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून नागरिकांना शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सामाजिक सुरक्षा यांसारख्या विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. केवळ माहिती देऊन न थांबता, पात्र लाभार्थ्याना या योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार आहे. प्रशासन आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून कार्य करताना हा कक्ष विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांच्या निवारा आणि आरोग्याच्या प्रश्नांवर विशेष लक्ष केंद्रित करेल, ज्यामुळे सर्वसामान्यांचा शासकीय प्रक्रियेवरील विश्‍वास अधिक दृढ होण्यास मदत होईल.

​प्रशासन आणि जनता यांच्यातील दरी कमी करण्यासाठी हा उपक्रम मैलाचा दगड ठरणार असल्याचे मत उपस्थित नागरिकांनी व्यक्त केले. भविष्यातही अशाच प्रकारे लोकहितकारी योजना राबवल्या जाव्यात, अशी अपेक्षा संगमनेरकरांकडून व्यक्त होत आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !