एकल महिलांना स्वावलंबी बनवणारा अहिल्यानगर देशातील एकमेव जिल्हा!

संगमनेर Live
0
एकल महिलांना स्वावलंबी बनवणारा अहिल्यानगर देशातील एकमेव जिल्हा!

◻️पालकमंत्री विखे पाटलांनी अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त केले अभिवादन

संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | महिलांच्या सक्षमीकरणा करीता केंद्र आणि राज्य सरकारने सुरू केलेल्या योजना मागे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांची प्रेरणा असल्याचे प्रतिपादन जलसंपदा तथा पालक मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंती दिनाच्या निमिताने मंत्री विखे पाटील यांनी पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनच्या मुख्य कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवीासाठी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर शहराचे अध्यक्ष अनिल मोहिते याप्रसंगी उपस्थित होते.

धर्म रक्षणाबरोबरच जनकल्याण आणि स्त्री सन्मानाला अहिल्यादेवी होळकर यांचे प्राधान्य होते. महिला अर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्या पाहीजेत या उद्देशाने महेश्वर येथे कुशल विणकरांच्या माध्यमातून हातमाग व्यवसायाला पाठबळ दिले. ही केवळ वस्त्रनिर्मीती नव्हती तर महिलांचा स्वाभीमान रोजगार आणि आत्मनिर्भरतेची सुरूवात होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात योजनांच्या माध्यमातून सुरू झालेल्या महिलांच्या सक्षमीकरणाच्या कार्यामागे अहिल्यादेवीच्या विचारांची प्रेरणा असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकराने महीलांकरीता मोठ्या प्रमाणात योजना सुरू केल्या. अहिल्यानगर जिल्ह्यात शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. परंतू त्यापुढे जावून एकल महिलांना पाठबळ देण्यासाठी सुरू झालेल्या योजनेमुळे एकल  महिलांना कौशल्या प्रशिक्षणाच्या संधी मिळाल्या आहेत. अनेक महीलांचे प्रशिक्षण पूर्ण होवून त्यांना रोजगार निर्माण झाला. आशा पध्दतीची योजना सुरू करणारा अहिल्यानगर जिल्हा एकमेव असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

तिर्थक्षेत्रांच्या विकासाचा एक आदर्श आहिल्यादेवीनी आपल्या कारकिर्दीत निर्माण केला. मंदीराचा जिर्णोध्दार घाटांचा विकास विहीरीची निर्मिती ही देशाच्या सांस्कृतिक परंपरेची प्रतिक असून जलसंवर्धन आणि जलव्यवस्थापनाचे उतम उदाहरण ठरले आहे. यातुन देशाच्या सांस्कृतिक एकात्मतेला बळकटी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

तिनशेव्या जयंतीच्या निमिताने जलसंपदा विभागाच्या वतीने अहील्यादेवीच्या विचारांची प्रेरणा घेवून काढण्यात आलेली गोदा ते नर्मदा जलयात्रा धर्म संस्कृती आणि पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी होती.यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश मधील  सांस्कृतिक परंपरेचा वारसा अधिक घट्ट झाला आहे.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !