अहिल्यादेवी होळकर या स्त्री शक्तीचे प्रतीक होत्या - मच्छिंद्र खेमनर (जानकर)

संगमनेर Live
0
अहिल्यादेवी होळकर या स्त्री शक्तीचे प्रतीक होत्या - मच्छिंद्र खेमनर (जानकर)

◻️ उंबरी बाळापूर सह पंचक्रोशीत अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती साजरी

​संगमनेर LIVE | “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी राबवलेले सुशासन हे आजही प्रशासकीय व्यवस्थेसाठी एक वस्तुपाठ आहे. शेतकरी, व्यापारी आणि सामान्य प्रजेच्या कल्याणाला त्यांनी दिलेले सर्वोच्च प्राधान्य आणि स्त्री शिक्षणासह अध्यात्मिक क्षेत्रात केलेले कार्य अतुलनीय आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने अहिल्यादेवी होळकर या स्त्री शक्तीचे प्रतीक होत्या” असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र खेमनर (जानकर) यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथे आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना खेमनर (जानकर) बोलत होते. रामभाऊ भुसाळ, सरुनाथ उंबरकर, भागवत उंबरकर, भिकाभाऊ खेमनर, पत्रकार सुरेश थोरात, अ‍ॅड. रवी शेळके, लक्ष्मण जुंधारे, लहानू डोखे, गणेश भुसाळ, विलास उंबरकर, दीपक शेळके, अंबाजी माळी, सुरेश भुसाळ, संपत भुसाळ, प्रतिक शेळके, दीपक चौधरी, पोपट खेमनर, सुरेश बाम्हणे, राधाकृष्ण चोपडे, गोरख माळवदे, चांगदेव खेमनर, गणेश जुधारे, रामभाऊ खेमनर, ज्ञानदेव सारबंदे, हौशीराम खेमनर, भागा खेमनर, अण्णासाहेब खेमनर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते.

​कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भिकाभाऊ खेमनर यांनी उंबरी बाळापूर येथे अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारावे, अशी भावना व्यक्त केली. तसेच रामभाऊ भुसाळ यांनी अहिल्यादेवीच्या कार्याला उजाळा दिला.

यावेळी पत्रकार सुरेश थोरात म्हणाले, की, गावा गावात गायरान जमिनी, शेततळे, बियाणे बॅक, हुंडा बंदी, अन्नछत्रे, वाटसरूसाठी पाणपोई, धर्मशाळा यांची अहिल्यादेवी होळकर यांनी सुरूवात आणि उभारणी केली. देशभरात हजारो मंदिरे आणि घाट बांधण्याबरोबरचं शेतकऱ्यांसाठी मोठे काम केले. काशी, गया, सोमनाथ आणि उज्जैन यांसारख्या तीर्थक्षेत्रांचा जीर्णोध्दार करून अहिल्यादेवी यांनी भारताची सांस्कृतिक ओळख जपल्याचे सांगितले.

अ‍ॅड. रवी शेळके म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी काश्मीर ते कन्याकुमारी पर्यत नद्यावर हजारो घाट बांधले. बारा ज्योतिर्लिगाचा जिर्णोध्दार केला. देशात हजारो विहिरी आणि बारवाची निर्मिती केली. विशेष म्हणजे माणसाप्रमाणे पशु पक्ष्यांना देखील पाणी पिता यावे यासाठी या बारवाची व विहिरींची संरक्षणा करण्यात आली. त्याच्या या कार्यामुळे लोक त्यांना पुण्यश्लोक म्हणू लागले. या कार्यक्रमांचे सुत्रसंचलन आणि आभार लक्ष्मण जुंधारे यांनी केले.

दरम्यान, अहिल्यादेवींच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त आश्‍वी बुद्रुक येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. तसेच आश्‍वी खुर्द, पिंप्री-लौकी अजमपूर, निमगावजाळी, दाढ खुर्द, शिबलापूर, शेडगाव, डिग्रस, मालुंजे, पानोडी, ओझर बुद्रुक, ओझर खुर्द, खांबे, वरंवडी यांसह पंचक्रोशीतील गावागावांत देखील जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वत्र त्यांना अभिवादन करून त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !