“धमकी आणि ऑफर देणाऱ्यांची नावे जाहीर करा!”

संगमनेर Live
0
“धमकी आणि ऑफर देणाऱ्यांची नावे जाहीर करा!”

◻️ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे अभिजित दिपके यांना आव्हान

संगमनेर LIVE (लोणी) | कोणाच्या दबावाला बळी पडून अभिजित दिपके यांनी वक्तव्ये करू नयेत. धमकी आणि ऑफर देणाऱ्यांची माहिती त्यांनी समोर येऊन दिली पाहिजे. केवळ भारतीय जनता पक्षाला बदनाम करण्यासाठी अशी वक्तव्ये करणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

केंद्र सरकार विद्यार्थ्यांच्या आंदोलनाविरोधात कधीच नव्हते. केंद्र सरकारने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत सकारात्मक चर्चा केली. विद्यार्थ्यांनीही त्यांचे आंदोलन मागे घेतले. मात्र, जनाधार गमावलेल्या काही राजकीय पक्षांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आधार घेऊन राजकारण सुरू केल्याची टीका त्यांनी केली. अभिजित दिपके यांनी संदिग्धता निर्माण करण्यापेक्षा माध्यमांसमोर येऊन कोणी धमकी आणि ऑफर दिली हे स्पष्टपणे सांगितले पाहिजे. केवळ भारतीय जनता पक्ष आणि नेतृत्वाला बदनाम करण्यासाठी अशी वक्तव्ये करणे उचित नाही. त्यांच्या माध्यमातून कोणी असा प्रयत्न करीत असेल तर, अभिजित दिपके यांनीही त्याला बळी पडू नये, असा सल्ला मंत्री विखे पाटील यांनी दिला.

जंतरमंतर मैदानावरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय प्रवेश परीक्षांबरोबरच इतरही परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी धाडसी निर्णय घेतला. परीक्षा सुधारणा विधेयक संसदेच्या दोन्हीही सभागृहांनी मंजूर केले, याचे संपूर्ण देशात स्वागत झाले आहे. देशातील परीक्षा पद्धतीतील सुधारणांसाठी केंद्र सरकारने तांत्रिक क्षेत्रातील अनुभवी व्यक्तिमत्त्व नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय टास्कफोर्स स्थापन करण्याचाही निर्णय करून, विद्यार्थ्यांना नवा विश्वास दिला असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

दरम्यान, काॅग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेमध्ये केलेल्या वक्तव्यावर भाष्य करताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, लोकसभेचे सभागृह हे बेताल वक्तव्ये करण्यासाठी नाही. त्याची गरिमा राखली गेली पाहिजे. त्यामुळेच खासदार अनुरागसिंह ठाकूर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात असंवैधानिक शब्द वापरल्याच्या कारणाने दाखल केलेल्या ठरावाचे त्यांनी समर्थन केले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !