कोयना धरण ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ नावाने ओळखले जाणार

संगमनेर Live
0
कोयना धरण ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ नावाने ओळखले जाणार

◻️ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती 

संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | पश्चिम महाराष्ट्राला वरदान ठरलेल्या कोयना जलसागराचे ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ असे नामांतर करण्याचा महत्वपूर्ण आणि ऐतिहसिक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने  घेतला असल्याची माहीती जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

कोयना जलसागरास यापुर्वी शिवाजी जलसागर या नावाने संबोधले जात होते. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख योग्य नसल्याने नावामध्ये बदल करून छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव  कोयना जलशायला द्यावे आशी मागणी होत होती.

जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत पुढाकार घेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जलशयाचे नामांतर करण्याबाबत विनंती केली होती.

महायुती सरकारने याबाबतचा शासन आदेश जारी करून कोयना जलसागरास नाव छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असे करण्याचा महत्वपूर्ण निर्णय जाहीर केल्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांनी सांगितले.

दरम्यान, जलसागराचे नामांतर करण्याची शिवप्रेमी नागरीकांची मागणी आणी जलसंपदा विभागाच्या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल मंत्री विखे पाटील यांनी आभार मानले आहेत.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !