उद्या संगमनेरमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’

संगमनेर Live
0
उद्या संगमनेरमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’

◻️ आमदार खताळांच्या उपस्थित विविध शासकीय योजना व दाखले एकाच छताखाली मिळणार

​संगमनेर LIVE | शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील पात्र नागरिकांपर्यंत सहजरीत्या पोहोचावा आणि त्यांची प्रशासकीय कामे एकाच ठिकाणी त्वरित व्हावीत, या उद्देशाने संगमनेर येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे’ भव्य आयोजन करण्यात आले आहे. 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त हे शिबिर आयोजित करण्यात आले असून उद्या शुक्रवार, दिनांक ३१ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हे समाधान शिबिराचा शुभारंभ होणार आहे.

​या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय दाखले व कल्याणकारी योजनांचा प्रत्यक्ष लाभ एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने उत्पन्न दाखला, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, नॉन-क्रीमी लेयर, जन्म-मृत्यू दाखले यांसारख्या आवश्यक प्रमाणपत्रांचे वाटप केले जाईल. याशिवाय संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना यांसारख्या सामाजिक सुरक्षा योजना, बांधकाम कामगार नोंदणी, तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती व नोंदणी प्रत्यक्ष केली जाणार आहे. 

विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती, दिव्यांग कल्याण योजना यांसारख्या सेवांसह महसूल, ग्रामविकास, आरोग्य, महिला व बालविकास आणि कामगार विभागांच्या विविध योजनांची माहिती व त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांबाबत शासकीय अधिकाऱ्यांमार्फत थेट मार्गदर्शन केले जाणार आहे.

दरम्यान, ​शासकीय कार्यालयांचे फेऱ्या न मारता नागरिकांची रोजची कामे सुलभ व्हावीत व सर्व पात्र लाभार्थ्यांना योजनांचे कवच मिळावे हा या शिबिराचा मुख्य हेतू आहे. तरी संगमनेर तालुक्यातील सर्व शेतकरी, महिला, युवक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व विविध योजनांसाठी पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांनी शुक्रवारी सकाळी १० वाजता या शिबिरास मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेना-महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !